मुलचेरा:-
शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान
योजनेचा चौदावा हप्ता जून महिन्यात देण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी लाभार्थींना केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यांनी केवायसी पूर्ण
केली नाही, त्यांनी सेतू केंद्र, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करून किंवा पीएम किसान अपच्या माध्यमातून ई- केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गर्शनाखाली कृषी सहाय्यक प्रदीप मुंडे,कृषी सहाय्यक कनिष्क वाघमारे तसेच तालुक्यांतील सर्व कृषी सहाय्यक यांनी गावो गावी जाऊन पीएमकिसन ई – केवायसी बाबत जनजागृती केले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या अनुषंगाने प्रधानमंत्री
किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. दर चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत केली जाते. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत १३ हप्ते
लाभार्थीना देण्यात आले आहेत. मात्र, चौदावा हप्ता देण्यासाठी ई-केवायसी करणे गरजेचे आहे.तसेच येत्या काळात महाराष्ट्र शासनाकडून अधिकचे 6000 मिळणार आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्यासाठी २२ जूनच्या आत ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसीसाठी लाभार्थीनी लगेच आँनलाईन सेवा केंद्र, कृषी विभागाचे कर्मचारी किंवा पीएमकिसान अपच्या साहाय्याने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी केले आहे.