ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे तसेच उद्धवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने उर्वरित मदत वितरित करण्याबाबत शासन निर्णय

Nuksan Bharpai Maharashtra:-ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्ता / शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF) दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेले निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून मागविण्यात आले होते.

दरम्यानच्या कालावधीत दि.१३.१०.२०२१ रोजीच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर, २०२१ पर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये वाढीव दराने मदत देण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दरानुसार

शासन निर्णय :

ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी संदर्भाधीन क्र.३ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून उर्वरित रु.१०३५००.१४ लाख (अक्षरी रुपये एक हजार पसत्तीस कोटी चौदा हजार फक्त) इतका निधी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहपत्रात जिल्हा निहाय दर्शविल्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांचेमार्फत संबधित जिल्हयांना वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. या शासन निर्णयान्वये संपूर्ण रक्कम बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात येत असली तरी, लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तिय शिस्तीच्या दृष्टीकोनातून संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष गरजेनुसारच कोषागारातून रक्कम आहरित करून त्यानंतरच रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने हस्तातंरित करण्याबाबत दक्षता घ्यावी.

सदर निधी अनावश्यकरित्या कोषागारातून आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. या आदेशान्वये मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या मर्यादेतच खर्च करण्यात यावा.

लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा. या सर्व सुचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची

GR PDF DOWNLOAD – CLICK HERE