FSSAI नोंदणी (अन्न परवाना) – फूड परवाना
एफ-एस-एस ए आयला आपण भारतीय अन्न प्राधिकरण (Food Safety And Standard Authority Of India) म्हणुन ओळखतो.एफ एस एस ह्या कायद्यानुसार रूल आणि रेग्युलेशनचे पालन करत असलेल्या खाद्य व्यावसायिकांना 14 अंकी लायसन नंबर जारी केला जात असतो.
आणि हा एफ एस एस ए आय हा लायसन नंबर एफ एस एस ए आय ह्या नेम लोगोसोबत फुड प्रोडक्टसवर छापला जाणे आवश्यक असतो.
एफ एस एस आय लायसन्स हे आपल्याला(FSSAI ) आयडी आणि पासवर्ड तयार करून फुड लायसन्स वेबसाईटवरून प्राप्त होत असते.
FSSAI License (फूड परवाना) म्हणजे काय?
जेव्हा आपल्याला भारतात स्वताचा फुड बिझनेस सुरू करायचा असतो.तेव्हा त्यासाठी आपल्याला एक लायसन्स काढावे लागत असते ज्याला FSSAI License असे म्हणत असतात.
एफ एस एस आय ची स्थापणा ही फुड सेफ्टी अँण्ड स्टँन्डर्ड सिक्युरीटी अँक्ट 2006 नुसार 5 आँगस्ट 2011मध्ये करण्यात आली होती.
एफ एस एस आय लायसन्स तसेच एफ एस एस आय रेजिस्ट्रेशनची आवश्यकता ही प्रत्येक फुड बिझनेस करत असलेल्या व्यक्तीला पडत असते.
FSSAI Registration करणे तसेच लायसन्स काढणे कोणासाठी गरजेचे असते?
एफ एस एस आय रेजिस्ट्रेशन करणे तसेच लायसन्स काढणे हे फुडशी संबंधित बिझनेस करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक असते.
- यात डेअरी,हाँटेल,फुड सेंटर,कँटिन,
- आँईल प्रोसेसिंग युनिटमध्ये,
- कत्तलखाना,रिलेबरल,
- रिपँकर्स,मँन्युफँक्चरींग
- आँनलाईन फुड डिलेव्हरी,
- केटरींग,स्टोरेज युनिट
- इत्यादी सगळया अशा व्यवसायांचा समावेश होत असतो ज्यात फुडशी रिलेटेड बिझनेस केला जात असतो.
FSSAI फूड लायसन्स प्रकार –
भारतामध्ये असलेले एफ एस एस आय लायसन्सचे तीन प्रमुख प्रकार कोणकोणते आहेत? – फूड लायसन्स प्रकार
1)बेसिक एफ एस एस आय लायसन्स : Basic License
2) स्टेट एफ एस एस आय लायसन्स : state License
3) सेंट्रल एफ एस एस आय लायसन्स : Central License
1)बेसिक एफ एस एस आय लायसन्स :
बेसिक एफ एस एस आय लायसन्स अशा व्यक्तींना दिले जाते ज्यांना आपला स्वताचा लघुउद्योग सुरू करायचा आहे.
हे लायसन्स आपल्याला सर्वसामान्यपणे एक ते पाच वर्षासाठी उपलब्ध होत असते.आणि ह्या लायसन्सचा लाभ अशाच व्यक्तींना होत असतो ज्यांचे वार्षिक उत्पन्न 12 लाखापेक्षा कमी असते.
2) स्टेट एफ एस एस आय लायसन्स :
स्टेट एफ एस एस आय लायसन्सचा लाभ आपल्यातील असे व्यक्ती घेऊ शकतात जे मध्यमवर्गीय उत्पादक तसेच विक्रेता आहेत.
याचसोबत हे लायसन्स प्राप्त करण्यासाठी आपले वार्षिक उत्पन्न बारा लाखापेक्षा अधिक असणे गरजेचे असते.हे लायसन्स देखील आपल्याला एक ते पाच वर्षासाठी उपलब्ध होत असते.
3) सेंट्रल एफ एस एस आय लायसन्स :
सेंट्रल एफ एस एस आय लायसन्स प्राप्त करण्यासाठी आपले वार्षिक उत्पन्न 20 करोड पेक्षा जास्त असावे लागते.
FSSAI Registration साठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती असतात? – Documents requirement for FSSAI Registration and License
एफ एस एस आय रेजिशस्ट्रेशनसाठी आपल्याला त्याच्या विविध प्रकारानुसार पुढील विविध कागदपत्रांची आवश्यकता भासत असते.
बेसिक रेजिस्ट्रेशनसाठी लागणारी कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पँन कार्ड
- 2 पासपोर्ट साईज फोटो
- अँड्रेस प्रुर्फसाठी -लाईट बिल तसेच रेट अँग्रीमेंट
एफ एस एस आय स्टेट आणि सेंट्रल लायसन्ससाठी लागणारी कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पँन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- अँड्रेस प्रूफ
- पाणी तपासणीचा रिपोर्ट (मँन्युफँक्चरिंग अँण्ड हाँटेल रेस्टाँरंट साठी)
- फुड कँटेगरी लिस्ट,रिसोर्स लिस्ट आणि युनिटचा फोटो.
- मँन्युफँक्चर प्रोसेसर्ससाठी ब्लु प्रिंट
- आँथरीटी लेटर
- डिक्लेरेशन फाँर्म
- ले आऊट प्लँन
- तसेच आपल्या व्यवसायानुसार इतर महत्वाची कागदपत्रे
FSSAI Registration तसेच लायसन्सचा कालावधी किती असतो?
एफ एस एस आय लायसन्ससाठी आपण कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 5 वर्षासाठी अँप्लाय करू शकतो.यानंतर आपल्याला आपले लायसेन्स रिनिव्हल करावे लागत असते.
FSSAI License Renewal विषयी जाणुन घ्यायच्या महत्वाच्या बाबी –
- एफ एस एस आय लायसन्सची लेट रिनिव्हल फी भरावी लागु नये यासाठी आपण लायसन्सची मुदत संपण्याच्या एक महिना आधी आपले लायसेन्स रिनिव्हल करून घ्यायला हवे.
- आणि समजा आपण लायसन्सची मुदत संपण्याच्या 30 दिवस आधी लायसन्स रिनिव्हल केले नाही तर लायसन्सची मुदत संपेपर्यत आपल्याला शंभर रूपये दर दिवशी भरावे लागत असतात.
- आपल्याला लायसन्सची पुर्ण मुदत संपल्यानंतर एफ एस एस आय रेजिस्ट्रेशन सर्टिफिकिट रिनिव्हल करता येत नसते.
- लायसन्सची मुदत संपल्यावर आपल्याला फुड लायसन्स प्राप्त करण्यासाठी पुन्हा नवीन अर्ज करावा लागत असतो.
FSSAI License चे फायदे कोणकोणते असतात?
- एफ एस एस आय लायसन्स घेतलेली तसेच रजिस्ट्रेशन केलेली व्यक्ती बाजारामध्ये कोणतेही असे फुड प्रोडक्ट आणु शकत नाही ज्याने कस्टमरला हानी पोहचेल.म्हणजे याने कस्टमरला प्युअर,शुदध,दर्जेदार फुड प्रोडक्ट दिले जात असतात.
- आपल्यालाकडे जर एफ एस एस आयचे लायसन्स असेल किंवा त्यात आपण रेजिस्ट्रेशन केलेले असेल तर आपल्या फुड प्रोडक्टवर कस्टमरचा ट्रस्ट अधिक जास्त वाढत असतो.ज्याने आपल्या प्रोडक्टची देखील जास्तीत जास्त विक्री होत असते.
FSSAI Registration तसेच Licence साठी आपण अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम आपण एफ एस एस आयच्या आँफिशिअल वेबसाईटवर जावे.मग पुढील प्रोसेससाठी Click Here To Foscos ह्या आँप्शनवर क्लीक करावे.
- मग यानंतर Foscos वेबसाईटवर प्रवेश केल्यानंतर आपल्याला साईन अप बटणवर क्लीक करून आपले एक अकाऊंट तयार करावे लागते.
- मग आपल्यासमोर एक फाँर्म येत असतो ज्यात विचारलेली सर्व माहीती आपल्याला भरावी लागत असते.
उदा: आपले नाव,ईमेल आयडी पासवर्ड मोबाईल नंबर,इत्यादी.
- मग तिथे आपल्याला एक कँप्च्या दिला जातो जो आपण जसाच्या तसा भरायचा असतो.
- मग यानंतर आपल्या ईमेल आयडी तसेच मोबाईलवर एक व्हेरीफिकेशन कोड येत असतो जो आपल्याला तिथे फील करावा लागतो.आणि मग शेवटी सबमीट बटणवर ओके करावे लागते.
- मग आपले रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यावर आपल्याला स्क्रीनवर Thanks For Successfully Registered With Food Safety असा मँसेज दिसत असतो.
- आता आपल्याला आपल्या अकाऊंटवर लाँग इन करायचे असते ज्यासाठी आपला लाँग इन आयडी आणि पासवर्ड तिथे इंटर करायचा असतो.आणि सोबत एक कँपच्या दिलेला असतो तो देखील फिल करावा लागतो.आणि साईन इन आँप्शनवर क्लीक करावे लागते.
- मग यानंतर आपल्याला ज्या फुड बिझनेससाठी लायसन्स हवे त्या बिझनेसविषयी सर्व आवश्यक माहीती भरावी लागते.
- मग यानंतर त्यासाठी आवश्यक असलेले डाँक्युमेंट देखील अपलोड करावे लागत असतात.
- सर्व माहीती भरून झाल्यावर तसेच डाँक्युमेंट अपलोड करून झाल्यावर आपल्याला पेमेंट करावे लागत असते.(एका वर्षासाठी आपल्याकडुन शंभर रूपये Conveneince Charge भरावा लागत असतो.पेमेंट करण्यासाठी आपण युपीआय,डेबिट कार्ड,नेट बँकिंगचा देखील वापर करू शकतो.
लायसन्स मिळण्यासाठी आपल्याला कमीत कमी दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागत असतो.
FSSAI License Registration ची फी किती असते?
एफ एस एस आय लायसन्स रेजिस्ट्रेशनची फी पुढीलप्रमाणे असते :
- एका वर्षाचा बेसिक रजिस्ट्रेशनसाठी दोन हजार लागत असतात.
- एका वर्षाच्या स्टेट लायसन्ससाठी वर्षाला पाच हजार फी भरावी लागते.
- एका वर्षाच्या सेंट्रल लायसन्ससाठी सात हजार पाचशे रूपये इतकी फी आपल्याला भरावी लागत असते.
FSSAI Licence Renewal कसे करतात ?
- एफ एस एस आय फुड लायसन्स रिनिव्हल करण्यासाठी आपल्याला फुड लायसन्सच्या आँफिशिअल साईटवर पुन्हा एकदा जावे लागते.
- आणि मग आपला लाँग इन आयडी आणि पासवर्ड इंटर करून आपल्या अकाऊंटवर लाँग इन करावे लागत असते.
- लाँग इन करून झाल्यावर आपल्याला Apply For Renewal Of License हे आँप्शन सिलेक्ट करावे लागते.
- मग आपल्याला कन्फरमेशन साठी पुन्हा एकदा लायसन्स रिनिव्हल करायचे आहे का नाही हे विचारले जाते त्यात आपल्याला येस आँप्शनवर ओके करावे लागते.
- मग यानंतर आपले सर्व महत्वाचे डाँक्युमेंट आपल्याला अपलोड करून सबमीट आँप्शन वर क्लीक करावे लागते.