गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती २०२१
महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश)
नियम, २०१९ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा आणि दिनांक २७.०६.२०२२, २३.०९.२०२२ व दिनांक २३.०९.२०२२ अन्वये
सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस दलातील पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक
यांची १६० रिक्त असलेली पदे भरण्यासाठीदेखील आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक ०९.११.२०२२ ते ३०.११.२०२२ या
| कालावधीत स्वीकारण्यात येतील. ह्याबाबत सविस्तर माहिती policerecruitment 2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in
या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे.
उमेदवारास पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक या पदांसाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल.
ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार
आहे.
उमेदवारास एकाच घटकातील एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करू शकत नाही.
उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द होईल.
●
पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल. सदर
•शारीरिक चाचणीत किमान ५० टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त जागांच्या १:१० या
प्रमाणात उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील.
●
लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी २५ गुणांची व जीप प्रकारातील वाहन
चालविण्याची चाचणी २५ गुणांची अशी एकूण ५० गुणांची कौशल्य चाचणी द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४०
टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल. कौशल्य चाचणी ही केवळ एक अहंता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले
गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत. कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या
उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी
आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाइन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
शारीरिक चाचणी व लेखी परीक्षामध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्तेनुसार तात्पुरती निवडसूची तयार करण्यात
येईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र
ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती (Provisional selection)
असेल. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय दिनांक
१०.१२.२०२० नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यात येईल.
पोलीस शिपाई चालक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे,
सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक
व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment 2022.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर
जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व
अनाथांकरिता उपलब्ध पदांच्या १% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी
ऑनलाइन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करावेत.
भरती प्रक्रियेदरम्बान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती
प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल. कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही.
उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे, त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने
अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करू शकतात, परंतु खुल्या प्रवर्गातील (Unreserved)
उमेदवार मागासवर्गीय प्रवगांत अर्ज करू शकणार नाहीत.
● पदोन्नतीवरील आरक्षणासंदर्भात शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ बाबत
होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या आदेशाच्या अधीन राहून व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्रमांक १७५/२०१८ व इतर संलग्न
याचिकांमध्ये दिनांक २७.०६.२०१९ रोजी दिलेल्या निर्णयाविरुद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेबाबत होणाऱ्या अंतिम
निर्णयाच्या अधीन राहून रिक्त पदांची गणना केलेली आहे. त्यामुळे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ
शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार नियुक्ती अधिकारी यांना पदे भरण्याचा अधिकार आहे.
शासनाने लागू केलेले खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी लागू केलेले आरक्षण हे या अनुषंगाने उद्भवणाऱ्या न्यायालयीन
प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन असेल.
महाराष्ट्र शासन, गृह विभाग, अधिसूचना दिनांक २३ सप्टेंबर, २०२२ अन्वये उमेदवाराला अतिरिक्त १०० गुणांची गोंडी माडीया भाषेची
लेखी चाचणी परीक्षा द्यावी लागेल. सदर लेखी परीक्षेमध्ये ३५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक असून सदरचे गुण अंतिम गुणवत्ता
यादी तयार करताना विचारात घेतले जाणार नाही..
महाराष्ट्र शासन, गृह विभाग, अधिसूचना दिनांक २३ सप्टेंबर, २०२२ अन्वये गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली
जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला
(Residential Certificate) जोडणे आवश्यक राहील.
● महाराष्ट्र शासन, गृह विभाग, अधिसूचना दिनांक २३ सप्टेंबर, २०२२ अन्वये असे उमेदवार गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर बदलीपात्र
असणार नाहीत.
स्वा/-
(नीलोत्पल, भा.पो.से.)
पोलीस अधीक्षक, गडचिरोली