ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2021

गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2021
महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक 23.06.2022 च्या सेवाप्रवेश
नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची 348 रिक्त असलेली पदे
| भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक 09.11.2022 ते 30.11.2022 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर
| माहिती policerecruitment 2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थध्यवर उमेदवारांच्या माहितीकरिता
| प्रसिद्ध करण्यात आली आहे.

● उमेदवारास पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदांसाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन
पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment 2022.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.
उमेदवारांस एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करू शकत नाही.

उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द होईल.
पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा
ही पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी
आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाइन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
● भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे
उमेदवारामधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या 1.10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्केपेक्षा कमी गुण असलेले
उमेदवारांस अपात्र समजण्यात येतील.
शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्तायादी तयार केली
जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळगीत पात्र
ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती (Provisional selection)
असेल. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय दिनांक
10.12.2020 नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यात येईल.
पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अहंता, शारीरिक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे/ कागदपत्रे, सामाजिक
व समांतर आरक्षणाबाबतची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ
आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment 2022.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये
उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरिता
उपलब्ध पदांच्या 1 टक्के आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदाबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने
आवेदन अर्ज सादर करावेत.
● भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती
प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल. कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही.
उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे, त्या घटकात रिक्त पदे विचारात घेऊनच उमेदवारानी अर्ज सादर
करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवगांत (Unreserved) अर्ज करू शकतात, परंतु खुल्या प्रवर्गातील (Unreserved)
उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करू शकणार नाहीत.
पदोन्नतीवरील आरक्षणासंदर्भात शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 28306/2017 बाबत
होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या आदेशाच्या अधीन राहून व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्रमांक 175/2018 व इतर संलग्न
याचिकांमध्ये दिनांक 27.06.2019 रोजी दिलेल्या निर्णयविरुद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवायत होणाऱ्या अंतिम
निर्णयाच्या अधीन राहून रिक्त पदांची गणना केलेली आहे. त्यामुळे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ
शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार नियुक्ती अधिकारी यांना पदे भरण्याचा अधिकार आहे.
● शासनाने लागू केलेले खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी लागू केलेले आरक्षण हे या अनुषंगाने उद्भवणाऱ्या न्यायालयीन
प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन असेल,
महाराष्ट्र शासन, गृह विभाग, आदेश दिनांक 23 मार्च, 2018 अन्वये उमेदवाराला अतिरिक्त 100 गुणांची गोडी माडीया भाषेची लेखी
चाचणी परीक्षा द्यावी लागेल. सदर लेखी परीक्षेमध्ये 35 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक असून सदरचे गुण अंतिम गुणवत्ता यादी
तयार करताना विचारात घेतले जाणार नाही.
● महाराष्ट्र शासन, गृह विभाग, आदेश दिनांक 23 मार्च, 2018 अन्वये गडचिरोली जिल्हयामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा
पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसीलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला
(Residential Certificate) जोडणे आवश्यक राहील.
● महाराष्ट्र शासन, गृह विभाग, आदेश दिनांक 23 मार्च, 2018 अन्वये असे गडचिरोली जिल्हयाच्या बाहेर बदलीपात्र असणार नाहीत
(नीलोत्पल भापो)
पोलीस अधीक्षक, गडचिरोली