मूलचेरा:-
गडचिरोली जिल्हापरिषद माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कांकडलवार यांनी आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात किंबहुना अहेरी उपविभागात खऱ्या अर्थाने विकासाची मशाल पेटवली.या आधीच्या ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य,जिल्हापरिषद सदस्य,सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष हे पदे भूषविली आपल्या कारकिर्दीत शासनाच्या नाविन्यपूर्ण योजना व सोयी सुविधा पुरविण्याचे कार्य त्यांनी केले.माजी जिल्हापरिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना आदिवासी समाजाची रूढी परंपरा, संस्कृती आदीची जाणीव आहे.दंडकारण्यकाची अभ्यासक म्हणूनही त्यांची ख्याती आहे.त्यांनी सामाजाची खरी नाळ ओळखून मूलभूत सोयी सुविधा सोबतच आदिवासीच्या सर्वांगीण विकासासाठी अखंडितपणे कार्य करीत आहेत. त्यांनी शिक्षण,सिंचन,आरोग्य हे ब्रीद घेऊनच राजकिय क्षेत्रात पाऊल टाकले आणि यशस्वी झाले”गावं तिथे विकास'” ही उक्ती घेऊन आज हेचं आपलं जीवनाचं ध्येय समजून अजय भाऊ कांकडलवार अविरत कार्य करत आहेत,अशा या विकास पुरुषांच्या वाढदिवसा निमित्ताने ग्रामीण रुग्णालय मूलचेरा येथे बिस्किटे व फळ वाटप करून साजरा करण्यात आला त्यावेळी मूलचेरा नगरपंचायत बालकल्याण सभापती जास्वंदा गोंगले, नगरसेवक संतोष चौधरी, नगरसेवक बंडू आलम,कोठारी ग्रामपंचायत सरपंच कु.रोशनी कुसनाके,ग्रामपंचायत सदस्य कालिदास कुसनाके,पल्लवी रातनपुरे, सुनीता बानोत,जीवनकला तालांडे, माजी उपसरपंच रवी झाडे, सामाजिक कार्यकर्ते सुबोल मंडल,विनोद बानोत,संदीप रातनपुरे, रामलू भुईया,लाचहुराम घुग्लोत आणि आविस कार्यकर्ते उपस्थित होते.

