ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

गडचिरोलीत स्टील हब ऑफ इंडिया होणार: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उच्च दर्जाचे खनिज असून या माध्यमातून आगामी काळात देशातील स्टील हब ऑफ इंडिया म्हणून नावलौकीकास येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी केले.

 पोलीस दलाच्या माध्यमातून आयोजित करण्यातपोलीस दलाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय गडचिरोली महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस अधीक्षक नीलोत्पल आदी उपस्थित होते.

यावेळी ना. देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचा रस्ते, पूल व पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला असून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याने नजीकच्या काळात गडचिरोली स्टील हब ऑफ इंडिया म्हणून उदयास येणार असून यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यातून मिळणारे उत्पन्न महाराष्ट्राच्या तिजोरीला हातभार लावणार आहे. जिल्ह्यात सर्वच प्रकारची कनेक्टीव्हीटी उपलब्ध करून देण्यावर भर असून रेल्वे, विमानतळ व सागरी वाहतूक सुरू करण्याच्या तयारीला वेग आला आहे. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीमधून नजीकच्या आंधप्रदेशपर्यंत सागरी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने समितीचे गठन केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

या माध्यमातून गडचिरोलीत पोर्ट उभारणार असल्याचेही सांगितले. गडचिरोली महोत्सवाला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला असून विविध खेळांमध्ये दुर्गम भागातील कलाकारांनी व खेळाडूंनी कौशल्य दाखविले आहे. विशेष म्हणजे, काष्ट कलेचे प्रदर्शन व प्रसिद्ध रेला नृत्य सहभाग नोंदवून आपली कला सिद्ध केली आहे. महाराष्ट्रातील इतर कलावंतांना बघण्याचे भाग्य सुद्धा या माध्यमातून लाभले आहे. पोलीस हे जनतेचे मित्र आहे. हे नाते निर्माण केल्यामुळे आज मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद या कार्यक्रमाला दिसून आला आलेल्या तीन दिवसीय गडचिरोली महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस अधीक्षक नीलोत्पल आदी उपस्थित होते.