अहेरी राजनगरीत प्रसिद्ध वाटकर भगिनींचा “गजर श्रीरामाचा” कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा.
श्रीमंत राजे अंब्रिशराव महाराज माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील रामभक्तची हजारोंच्या संख्येने तुडूंब गर्दी..!
अहेरी:-अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे उद्घाटन व श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारी रोजी होणार असून,अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येतील श्रीराम मंदिर आता सर्वांसाठी खुले होणार आहे.संपूर्ण देशातील श्रीराम भक्तासाठी हा आनंदाचा क्षण असणार आहे.
अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे औचित्य साधून अहेरी राजनगरीत प्रसिध्द वाटकर भगीनी यांचा “गजर श्रीरामाचा” या कार्यक्रमाचे आयोजन आपल्या अहेरी येथील ‘वृंदावन धाम’ येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमंत राजे अंब्रिशराव महाराज माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून विभाग सहप्रचारक श्री.सागरजी अहिरे,जिल्हा अध्यक्ष विश्व हिंदू परिषद श्री.सीतारामजी सोनानीया,सामाजिक कार्यकर्ते दत्ता भाऊ शिर्के,युवा नेते अवधेशबाबा आत्राम हे होते.
प्रसिद्ध गायिका कु.धनश्री वाटकर आणि कु.भाग्यश्री वाटकर ह्या भगिनींच्या सुरेल आवाजात भगवान श्रीराम यांच्या भक्ती संगीताने संपूर्ण अहेरी राजनगरी भक्तीमय झाली.आणि भारत का बच्चा-बच्चा ‘जय श्री राम’ बोलगा” या संगीताने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेला.
प्रसिद्ध वाटकर भगिनींचा “गजर श्रीरामाचा” कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमंत राजे अंब्रिशराव महाराज माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांनी केले होते.या कार्यक्रमासाठी समस्त अहेरी विधानसभा क्षेत्रातील रामभक्त आणि स्थानिक अहेरीकर यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली होती..!