ताज्या घडामोडी ताज्या बातम्या देश महाराष्ट्र राज्य रोजगार विदर्भ

लागा तयारीला, नोकऱ्यांचा महापूर येणार..! महाराष्ट्रासाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा..

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील मोठमोठे प्रकल्प गुजतरातला गेल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी राज्य सरकारवर आरोपांची राळ उठवली होती. दुसरीकडे, सत्ताधाऱ्यांकडून त्याला प्रतित्त्यूर दिलं जातं होतं. राज्याच्या राजकारणात असा कलगीतूरा रंगलेला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली.

राजधानी मुंबईत आज रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरुणांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यावेळी पीएम मोदी यांनी महाराष्ट्रात 2 लाख कोटीं रुपयांचे 225 प्रकल्प मंजूर केले असल्याची मोठी घोषणा केली. या प्रकल्पांमुळे आगामी काळात महाराष्ट्रातील तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचा दावाही पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.

रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध

ते म्हणाले, की महाराष्ट्रातील प्रकल्पांवर काम सुरु आहे. काही प्रकल्प सुरु होत आहेत. महाराष्ट्रातील रेल्वेसाठी 75 हजार कोटी, तसेच रस्ते विकास प्रकल्पासाठी 50 हजार कोटींचा निधी दिला आहे. देशभर पायाभूत सुविधा, माहिती-तंत्रज्ञान व इतर क्षेत्रांत सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहे. त्यामुळे तरुणांना रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण होत आहेत.

गेल्या 8 वर्षात 8 कोटी महिला ‘सेल्फ हेल्प’ ग्रुपशी जोडल्या गेल्या. त्यांना साडे पाच लाख कोटींची मदत दिली आहे. या ग्रुपशी जोडलेल्या महिला इतर महिलांना रोजगार देत आहेत. स्टार्टअप, लघु उद्योगांना सरकार आर्थिक मदत करतेय. जेणेकरुन तरुणांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. सरकारच्या प्रयत्नांमधून सर्वांना समान स्वरुपात रोजगाराच्या संधी मिळणार असल्याचे पीएम मोदी यांनी सांगितले.