ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य रोजगार विदर्भ

बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर, नोकर भरतीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय…

कोरोना काळात सारं काही ठप्प झालं होतं.. महसूली उत्पन्न घटले होते. दुसरीकडे आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी मोठा खर्च होत होता. या साऱ्याचा परिणाम राज्य सरकारच्या तिजोरीवर झाला होता. त्यामुळे राज्य सरकारने नोकर भरतीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले होते..

सरकारी नोकर भरती बंद असल्याने सध्या राज्यात दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यापैकी सुरुवातीच्या टप्प्यात 75 हजार जागांसाठी नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी ठाकरे सरकारने नोकर भरतीवर घातलेले निर्बंध शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतले आहेत.

नोकर भरतीवरील निर्बंध शिथील

कोरोना काळात राज्य सरकारने केलेली 50 टक्के नोकर भरतीची मर्यादा शिथील करण्यात आली असून, आता 100 टक्के नोकरभरती केली जाणार आहे. नोकर भरतीवरील निर्बंध हटवल्याने सरकारच्या विविध विभागांमध्ये पहिल्या टप्प्यात तब्बल 75 हजार रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विभागनिहाय होणारी भरती..

▪️  आरोग्य खाते – 10,568
▪️  गृह खाते – 11,443
▪️  ग्रामविकास खाते – 11,000

▪️  कृषी खाते – 2500
▪️  सार्वजनिक बांधकाम – 8337
▪️  नगरविकास खाते – 1500

▪️  जलसंपदा खाते – 8227
▪️  जलसंधारण खाते – 2423
▪️  पशूसंवर्धन खाते – 1047

सरळसेवा कोट्यातील भरती

सुधारित आकृतीबंध अंतिम झालेल्या शासकीय विभागांना सरळसेवा कोट्यातील 100 टक्के रिक्त पदांची भरती करण्यास मान्यता देण्यात आली. सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झाला नसलेल्या विभागांतील गट ‘अ’, गट ‘ब’ आणि गट ‘क’मधील सरळसेवा कोट्यातील 80 टक्के रिक्त पदे भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. मात्र, वाहनचालक व गट ‘ड’ संवर्गातील पदांची भरती यातून वगळली आहे.