शेवटच्या वंचित घटकापर्यंत असलेल्या जनतेपर्यंत पोहचण्यासाठी मेळावे आवश्यक-: सर्वेश मेश्राम तहसीलदार मुलचेरा
मुलचेरा-: शेवटच्या वंचित घटकापर्यंत असलेल्या जनतेपर्यंत पोहचण्यासाठी मेळावे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुलचेऱ्याचे तहसीलदार सर्वेश मेश्राम यांनी गोमनी येथे आयोजित शासकीय दाखल्यांची जत्रा तसेच भव्य महाराजस्व अभियान कार्यक्रमात केले. सदर कार्यक्रम गोमनी येथे बऱ्याच वर्षानंतर होत असल्यामुळे लोकांचा सहभाग पण तेवढाच उत्साहपूर्ण होता. सदर शिबिरात परिपूर्ण ऑनलाईन तयार झालेले जातीचे प्रमापनपत्र, अधिवास प्रमाणपत्र,उत्पन्न दाखले, जेष्ठ व्यक्ती दाखले, अल्पभुधारक प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र,आयुष्यमान भारत कार्ड, राशन कार्ड, घरकुल मंजुरी आदेश, जॉब कार्ड, ड्रायविंग लायसन्स,दारिद्र्य रेषा दाखला, नमुना आठ अ, शबरी घरकुल मंजुरी आदेश इत्यादी प्रमाणपत्रांचे वितरण तसेच राजीव गांधी विदयार्थी अपघात विमा योजनांतर्गत भगतनगर येथील मृत दोन विदयार्थ्यांच्या वारसानाना प्रत्येकी 75000 हजार रुपयांचे दोन धनादेश, शेतकरी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत दोन लाभार्थ्यांना ट्रॅक्ट्ररच्या चाव्या तसेच अनुदानाचे डिबिटी प्रणालिद्वारे जमा होणाऱ्या अनुदानाचे प्रतिकात्मक धनादेश व 83 शालेय विदयार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत सायकलीचे वितरण, तीन लाभार्त्यांना क्षतिग्रस्त घरांच्या नुकसानीच्या भरपाईचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या उदघाटिका म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम हलगेकर, अध्यक्ष म्हणून उत्तमरावं तोडसाम उपविभागीय अधिकारी चामोर्शी, युद्धिष्टीर बिश्वास माजी सभापती बांधकाम जिल्हा परिषद गडचिरोली, जुवारे संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मुलचेरा, सुवर्णा येमुलवार माजी सभापती पंचायत समिती मुलचेरा, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील,विनोद हाटकर एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मुलचेरा, राजेंद्र तलांडे नायब तहसीलदार मुलचेरा, गौतम गटशिक्षण अधिकारी मुलचेरा, रामटेके विस्तर अधिकारी मुलचेरा, लाकडे कृषी अधिकारी पंचायत समिती मुलचेरा, प्रमाम बिश्वास सरपंच गोविंदपूर, उमेश कळते सरपंच आंबटपल्ली, साईनाथ चौधरी उपसरपंच गोमनी , शंकर वंगावार माजी सरपंच गोमनी यांची उपस्थिती व्यसापीठावर होती. सदर शिबिरात तालुका कृषी अधिकारी, पंचायत कृषी, विज वितरण कंपनी, पशुवैधकीय पथक, पंचायत समिती, पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र सुंदरनगर, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, तसेच इतर विभागाच्या वतीने स्टाल लावून विविध योजनेंचा लाभ तसेच जनजागृती करण्याचे काम शिबिरस्थळी करण्यात आले.शिबिराला गोमनी परिसरातील बहुसंख्य जनता उपस्थित होती. सदर शिबिराचे संचालन तसेच आभार प्रदर्शन गोमनी चे तलाठी रितेश चिंदमवार यांनी केले.