वर्धा : संपाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यव्यवस्था कोलमडू नये म्हणून प्रशासन सतर्क झाले आहे. सेवाग्रामचे कस्तुरबा रुग्णालय व सावंगीचे विनोबा भावे रुग्णालय दिमतीला घेत प्रशासनाने संपकर्त्यांना चोख उत्तर देण्याचा प्रयत्न चालविला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पराडकर यांच्याकडून आरोग्य विषयक कारभाराचा आढावा घेताना संप लांबल्यास काय करता येईल याबाबत चर्चा केली. आरोग्य कर्मचारी संपावर असल्याने रुग्णांची गैरसोय होऊ न देण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.फारसा फरक पडला नसल्याचे दिसून आले. खासगी रुग्णालयांनाही सतर्क करण्याची सूचना झाली. सावंगीचे डॉ. उदय मेघे व डॉ. अभय गायधने यांनी सर्व ती तयारी असल्याचे स्पष्ट केले. तसेच सेवाग्रामच्या डॉ. पूनम वर्मा यांनीही समर्थ असल्याचे स्पष्ट केल्याने प्रशासनाचा जीव भांड्यात पडला. संप लांबल्यास संभाव्य अडचणी दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे ठरले. शासकीय आरोग्य केंद्रांना काही तुटवडा भासल्यास सेवाग्राम व सावंगीचे वैद्यकीय मनुष्यबळ तत्पर असल्याची खात्री मिळाली. जिल्हाधिकारी कर्डीले यांनी यासोबतच दोन्ही रुग्णालयास जिल्हाभर आरोग्य शिबिरे घेण्याची सूचना केली. एकूणच संपावर योग्य तो तोडगा तयार ठेवण्यात प्रशासन हालचाल करीत असल्याची घडामोड आहे.
Related Articles
‘दिलखुलास’ कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून बुधवार दिनांक 4 जानेवारी, गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. मराठी भाषेचा […]
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. २३ : देशभरातील विद्यार्थी अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट मध्ये (एबीसीआयडी) आपले खाते उघडत आहेत.आत्तापर्यंत देशातील १ हजार १६० शैक्षणिक संस्थांनी अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट मध्ये सहभाग घेतला आहे.यात राज्यातील ११० शैक्षणिक संस्थांचा सहभाग आहे. देशात सक्रिय असलेली पहिले चारही राज्याचे विद्यापीठ यात आघाडीवर राहिले आहेत, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री […]
लोकसेवा आयोगाकडून सरळसेवा भरतीकरिता १ व २ डिसेंबरला चाळणी परीक्षा
मुंबई, दि.४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरिता विविध संवर्गासाठी संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा १ व २ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहणार आहे. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण, दिनांक इत्यादी तपशील स्वतंत्रपणे […]