उद्या अर्थात गुरूवारी अनंत चतुर्दशी असून सार्वजनिक गणरायाचे विसर्जन केले जाणार आहे. अशातच राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.
अनंत चतुर्दशी आणि ईद-ए- मिलाद हे सण एकाच दिवशी आल्याने महाराष्ट्र सरकारने शुक्रवार २९ सप्टेंबरला शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली.
*पहा काय सांगितले राज्य सरकारने*
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एकाच दिवशी होणार असून,
गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून २९ सप्टेंबरला शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.