मुलचेरा-: तालुका महसूल प्रशासन च्या वतीने गोमणी येथे भगवंतरावं माध्यमिक आश्रम शाळेमध्ये दिनांक 20 एप्रिल ला शासकीय योजनांची जत्रा तसेच महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, अल्पभुधारक प्रमाणपत्र, शेतकरी दाखले, भूमिहीन दाखले, उत्पन दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, श्रम कार्ड, राशन कार्ड, जेष्ठ व्यक्ती प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रांचे वितरण होणार आहेत.सदर शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र सुंदरनगर च्या वतीने रुग्ण तपासणी व मोफत औषधोपचार होणार आहे व त्याचप्रमाणे तालुका स्थरावरील सर्व शासकीय विभागामार्फत शिबिरस्थळी स्टाल लावून विविध शासकीय योजनांची जनजागृती तसेच प्रत्यक्ष लाभ देण्याचे काम करण्यात येणार आहे. तरी सदर शिबिराला जास्तीत जास्त संख्येने लोकांनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आव्हाहन मुलचेऱ्याचे तहसीलदार सर्वेश मेश्राम, नायब तहसीलदार राजेंद्र तलांडे, मंडळ अधिकारी युवराज भांडेकर गोमणी चे तलाठी रितेश चिंदमवार यांनी केले.
Related Articles
महाप्रित व आय.आय.टी. मुंबई यांच्यात कार्बन कॅप्चरिंग व ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत सामंजस्य करार
मुंबई, दि. २३ : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व भारतीय प्रौद्योगिक संस्थान, मुंबई (आय.आय.टी. मुंबई) यांच्यात कार्बन कॅप्चरिंग व ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबाबत संयुक्त प्रकल्प राबविण्याच्या दृष्टिकोनातून सामंजस्य करार करण्यात आला. या करारावेळी महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी (भा.प्र.से.), महाप्रितचे मुख्य महाव्यवस्थापक शरणप्पा कोल्लूर, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. आय.आय.टी. बॉम्बेचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद […]
लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या ३९७३ पशूंची नुकसान भरपाई पशूपालकांच्या खात्यावर जमा
मुंबई, दि. ८: राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 3973 पशूंच्या नुकसान भरपाईची 10.23 कोटी इतकी रक्कम पशूपालकांच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. श्री सिंह म्हणाले, “राज्यामध्ये दि. 8 नोव्हेंबर 2022 अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3428 संसर्ग केंद्रांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण […]
जितेंदर सिंह शंटी व रविकिरण गायकवाड मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित
-लोकरथ बातमी- मुंबई, दि. 24 : कोरोना संसर्गाच्या काळात चार हजार कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार करणारे जितेंदर सिंह शंटी व कोविड रुग्णांसाठी अॅम्ब्युलन्स व ऑक्सिजन टँकर्स पुरविणारे रविकिरण गायकवाड यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मदर तेरेसा स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजभवन येथे झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला हार्मनी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अब्राहम मथाई व […]