ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दैनिक भास्कर व दैनिक तरुण भारत कार्यालयास भेट

नागपूर, दि. 2 – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी आज दैनिक तरुण भारत कार्यालयास भेट देत दिली.  यावेळी नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष विलास डांगरे, कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, प्रबंध संचालक धनंजय बापट, मुख्य  संपादक गजानन निमदेव यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दैनिक भास्कर कार्यालयास भेट

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथील दैनिक भास्कर कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते दैनिक भास्कर समूहाच्या निर्णायक मंडळाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समूह संपादक प्रकाश दुबे, संचालक सुमीत अग्रवाल, माजी न्या.विकास शिरपूरकर, संपादक मणिकांत सोनी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.