मुंबई, दि. ९ : येथील गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेले भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी करत अभिवादन केले. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर…” या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला.कोरोनाच्या सावटानंतर यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा झाला. गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर जमलेल्या भाविकांच्या जनसागराला अभिवादन करण्यासाठी रात्री पावणे आठच्या सुमारास राज्यपालांसह, मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आगमन झाले. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.याठिकाणी मुंबई महापालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या मंडपातून राज्यपाल श्री. कोश्यारी, मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गणेश मिरवणुकींवर पुष्पवृष्टी करून अभिवादन केले. चौपाटीवर उभारण्यात आलेल्या मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला त्यांनी भेट देऊन पाहणी केली आणि तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. सातत्याने सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे चौपाटीवर उभारण्यात आलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमास देखील त्यांनी भेट दिली.सण उत्सवांच्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचे कार्य होते. यंदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा होत असल्याने भाविकांचा उत्साह ओसांडून वाहतोय, असे सांगत आगामी सण-उत्सव देखील निर्बंधमुक्त आणि जल्लोषात साजरे व्हावेत, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
Related Articles
‘या’ लोकांचे पॅन कार्ड आता थेट रद्द होणार, आयकर विभागाचा कडक इशारा..!
केंद्र सरकारने पॅन कार्ड हे आधारला लिंक करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी वारंवार मुदतवाढही देऊनही अनेकांनी पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक केलेले नाही. याबाबत आयकर विभागाने आता कडक निर्णय घेतला आहे. पॅन कार्ड रद्द होणार पॅन कार्ड व आधार लिंकिंगसाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर 31 मार्च ते 30 जून 2022 पर्यंत 500 […]
राष्ट्रीय बियाणे महामंडळात 89 जागांसाठी भरती
National Seeds Corporation Limited- NSCL, India Seeds, NSC Recruitment 2020 (India Seeds Bharti 2023, NSC Bharti 2023) for 89 Junior Officer I, Management Trainee, & Trainee Posts. जाहिरात क्र.: RECTT/1NSC/2023 Total: 89 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 ज्युनियर ऑफिसर I (लीगल) 04 2 ज्युनियर ऑफिसर I (विजिलेंस) 02 3 मॅनेजमेंट ट्रेनी […]
अंध व्यक्तींच्या ध्वज निधी संकलन मोहिमेचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ
दिव्यांगांना सहानुभूती नको; समाजाचे सहकार्य व आशीर्वाद हवेत – राज्यपाल रमेश बैस मुंबई, दि. 14 : दिव्यांग व्यक्तींची ज्ञानेंद्रिय अधिक तल्लखपणे काम करतात. अनेक बाबतीत ते सामान्य व्यक्तींपेक्षा अधिक चांगले काम करतात. दिव्यांग व्यक्तींना समाजाकडून सहानुभूती नको, तर त्यांना सहकार्य आणि आशीर्वाद हवेत, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. राज्यपालांच्या हस्ते अंध व्यक्तींच्या […]