कुसुम योजनेंतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्यात आस्थापित करण्यात येणाऱ्या सौर कृषि पंपांसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील तरतुदींतून रु. 1050.00 लाख इतकी निधी मागणी ऊर्जा विभागाने केली आहे
Kusum Yojana – कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत टप्पा २ सुरू पहा आजचा शासन निर्णय
आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत ऊर्जा विभागाकडून अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेंतर्गत महाउर्जा (MEDA) प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या कुसुम योजनेंतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्यात आस्थापित करण्यात येणाऱ्या सौर कृषि पंपांसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील तरतुदींतून रु. 1050.00 लाख इतकी निधी मागणी ऊर्जा विभागाने केली आहे..
उपरोक्त प्रस्तावास अनुसरुन सन 2022-23 च्या अर्थसंकल्पिय तरतुदींतून वितरणासाठी उपलब्ध मर्यादेत निधी वितरीत करण्याबाबत संदर्भाधीन क्र. 2 येथील नस्तीवर प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरुन निधी वितरणाची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी मागणी क्र.टी-5 मधील मुख्य लेखाशीर्ष 2810 नवीन व नवीकरणीय ऊर्जा मधील मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी सन 2022-23 च्या आर्थिक वर्षाच्या उपलब्ध तरतुदींतून रु. 1050.00 लाख इतका निधी खालीलप्रमाणे अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
उपरोक्त प्रमाणे एकूण रु.1050.00 लाख (अक्षरी रुपये दहा कोटी पन्नास लाख फक्त) इतका निधी प्रशासकीय विभागप्रमुख म्हणून प्रधान सचिव, ऊर्जा विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात येत आहे.
शासन निर्णय (GR) डाऊनलोड
येथे पहा