गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे थाटात उद्घाटन

– आयुष्य गतिमान करायचे असेल तर वेळेनुरूप स्वतः त बदल घडविणे काळजी गरज.—– श्री. चेतन पाटील, तहसीलदार, मुलचेरा 

मुलचेरा: तालुक्यातील गणेशनगर येथे आयोजित केलेल्या स्थानिक नेताजी सभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे अत्यंत थाटात उद्घाटन पार पडले. गणेशनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परीसरात आयोजित केलेल्या या शिबिरात ग्रामस्थ व विद्यार्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

याप्रसंगी व्यासपिठावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंजीत मंडल, शिबिराचे उद्घाटक मूलचेरा चे प्रथम नागरिक तहसीलदार श्री. चेतन पाटील, प्रमुख अतिथी श्री. तपण मल्लिक उपसरपंच, विवेकानंदपुर, विष्णुपद सरदार पोलीस पाटील, गणेशनगर, श्री. ललित गाईन, महात्मा गांधी तंटा मुक्त अध्यक्ष ,गणेशनगर, श्री. मनमथ मंडल, श्री. भूपती सरदार, श्री. निरपद मिस्त्री, श्री. विकास घरामी, श्री . अली मंडल आदी प्रतिष्ठित नागरिक, तसेच श्री. सुजय बछाड, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांनी आयुष्य गतिमान करायचे असेल तर वेळेनुरूप स्वतः त बदल घडविणे काळजी गरज आहे असे प्रतिपादन मा. चेतन पाटील तहसीलदार यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. पुठे त्यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना च्या स्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले, समजाच्या विकासात रा. से. यो. चे महत्व अनन्यसाधारण कसे आहे हे विविध उदाहरण द्वारा विशद केले. यापुढेही जाऊन त्यांनी रा. से. यो. च्या चिन्हातील प्रत्येक रंगाचे उदाहरण देऊन त्यांचे महत्त्व विद्यार्थ्याना पटवून दिले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रंजीत मंडल यांनी विद्यार्थ्याना एकजुटीने रिबिरात राहून समाजसेवेचे व्रत हाती घेउन काम करण्याचे आवाहन केले. रासेयो स्वयंसेवकांनी जात, धर्म, भाषा, हे सर्व बाजूला सारून समाज सेवा करायचे असे वक्तव्य आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. तसेच सात दिवस चालणाऱ्या शिबिरकरिता सर्व विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या. 

उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमांचे प्रास्तविक वाचन रा. से.यो. सह कार्यक्रम अधिकारी डॉ. शनवारे यांनी आपल्या भाषणात सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमा संदर्भात माहिती दिली. 

उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यानी गणेशनगर येथे असलेले वृद्धाश्रमास सदिच्छा भेट देण्यात आली. वृद्धाश्रमाचे संचालक श्री. मनमथ मंडल यांनी याप्रसंगी विद्यार्थ्याना मागदर्शन केलें. 

कार्यक्रमांचे सुत्रसंचालन राष्ट्रिय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गौतम वाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पुस्तोडे यांनी मानले. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. शिवप्रसाद हरी, तथा शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. समीर सैय्यद, श्री. भीमराव निमसरकर, श्री. आशीष चनकापुरे यांनी मोलाचे सहकार्य केले.