ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मलेझरी येथे भव्य कबड्डी सामन्याच् उदघाटन माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते संपन्न

क्रीडा क्षेत्रात युवकांनी नाव लौकिक करावं:माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम

मूलचेरा:-
स्थानिक मूलचेरा तालुक्यातील अडपल्ली माल ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मलेझरी येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम तथा क्रीडा प्रसारक मंडळ तथा वीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कबड्डी सामने मलेझरी येथील पटांगणात आयोजित करण्यात आले होते, त्या प्रसंगी उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेट चे राजे अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं,राजे छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,त्यावेळी ते म्हणाले कब्बडी या खेळाने युवा स्वतःची प्रगती करू शकतो आपलं भविष्य बनवू शकतो आणि आपल्या क्षेत्राचं नाव उंचावर नेऊ शकतो,मी आजपर्यंत आपल्या क्षेत्रातील युवा वर्गाला प्रत्येक खेळासाठी प्रोत्साहन देत असतो,युवा वर्गाला सहकार्य करत असतो,क्रीडा क्षेत्रात युवकांनी नाव लौकिक करावं आणि युवा वर्गाने सामाजिक कार्यात सदैव समोर यावं मी आपल्या सोबत आहो माझ्या कडून मी सर्वोतोपरी सहकार्य करत राहीन असे मत त्यांनी या वेळी दिले,तसेच मलेझरी या गावात युवा वर्गाला खेळण्यासाठी क्रीडा संकुल ची गरज आहे त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन,महिला बचत गट च्या माध्यमातून सक्षम बनल्या पाहिजेत त्यासाठी सुध्दा प्रयत्न करीन असे मत त्यांनी यावेळी दिले .कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बादल शहा जिल्हा सचिव भारतीय जनता पक्ष, प्रकाश दत्ता तालुका अध्यक्ष भारतीय जनता पक्ष, बिधान वैद्य महामंत्री बंगाली आघाडी, सुभाष गणपती जिल्हा महासचिव, वामनराव कन्नके, सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते,युवा नेते गणेश गारघाटे,प्रकाश कन्नके, गणेश बँकावार,दिवशे सर हे होते,आज कार्यक्रमात मान्यवरांच् पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, सोबतच लहान मुलींचं नृत्य सादर करत राजे अमरीशराव आत्राम यांच्या स्वागत करण्यात आले, आजच्या कार्यक्रमाचे आयोजन संदीप चौधरी, किशोर नेवारे, दीपक शेडमाके,आकाश आभारे, राहुल बावणे,वैभव चौधरी यांनी केलं, त्यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी,शालेय विद्यार्थी,कबड्डी खेळाडू उपस्थित होते.