ठाणे, दि. 14 (जिमाका) – देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, तहसीलदार राजाराम तवटे आदी उपस्थित होते. पंडित नेहरू यांचा जन्मदिन 14 नोव्हेंबर हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील बालकांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
