मुंबई, दि.13 नोव्हेंबर : माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास स्व.वसंतदादा पाटील स्मारक समिती सदस्य यशवंत हाप्पे आणि विधानसभा अध्यक्षांचे सचिव महेंद्र काज यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.