ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अहेरी येथिल लक्ष्मीपूर वार्ड क्रं 1, येथे विर बाबुराव शेडमाके यांना विनम्र अभिवादन.

अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतिश पोरतेट यांची उपस्थिती

अहेरी:- दिनांक २१/१०/२०२३ रोजी शहरातील लक्ष्मीपूर वार्ड क्रं, १ येथे वीर बाबुरावजी शेडमाके यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम वॉर्डातील नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरात रॅली काढण्यात आली व लक्ष्मीपूर वार्ड क्रं १, येथे क्रांतिवीर शहिद वीर बाबुरावजी शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
सदर कार्यक्रमाला अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतिश पोरतेट यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.
यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.