मुलचेरा:-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली तथा गट साधन केंद्र मुलचेरा अंतर्गत दिनांक 14/02/2023 ला मराठी भाषा संवर्धन उपक्रमअंतर्गत गट साधन केंद्र मुलचेरा येथे तालुकास्तरीय शिक्षकांकारिता पाठयक्रमांतील मराठी कविताचे गायन स्पर्धा मा.गौतम मेश्राम गटशिक्षणाधिकारी गट साधन केंद्र मुलचेरा , मा. विलास श्रीकोंडा वार गटसमन्व्यक गट साधन केंद्र मुलचेरा यांच्या प्रमुख उपस्थित स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेकारिता चार केंद्रातील चार स्पर्धक उपस्थित होते.स्पर्धेचे पर्यवेक्षक व निरीक्षक म्हणून मा. श्री. डॉ. महाकारकर , केंद्रप्रमुख श्री. कोमरेवार व श्री. महेश मडावी फुलोरा सुलभक उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्री प्रमोद झाडे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोपरअल्ली यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमर पालारापवार वि.सा.व्य.यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्री. राजेश नागपूरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गट साधन केंद्र मुलचेरा येथील कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Related Articles
सहा महिन्यांत कायमस्वरूपी पुनर्वसन करणार : इरशाळवाडीवासियांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा
मुंबई, दि. १५ : इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री इरशाळवाडीवासियांचे अश्रू पुसण्यासाठी आले. त्यांनी वडीलकीच्या नात्याने सर्वांना धीर दिला..शासन भक्कमपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली. कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था सहा महिन्यांत होईल, असा विश्वास स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने यावेळी दिला! दिवसभरातील स्वातंत्र्य […]
पायाभूत सुविधांची निर्मिती आणि उद्योगाला पोषक वातावरण निर्मिती करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘न्यूज १८ लोकमत’ च्या उद्योगरत्न पुरस्कारांचे वितरण मुंबई, दिनांक २८: पायाभूत सुविधांचा विकास झाला तर राज्य प्रगतीकडे जाते. त्यामुळे या सुविधा निर्माण करणे, उद्योग वाढीसाठी पूरक वातावरण निर्माण करणे आणि लोकहिताचा कारभार करणे याला राज्य शासनाचे प्राधान्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. न्यूज १८ लोकमतच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उद्योग रत्न पुरस्काराचे […]
महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांची परिषद संपन्न शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याचे निर्देश मुंबई, दि. ११ – राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष […]