भाजपामध्ये बुथ प्रमुख हा पक्षाचा प्रमुख अंग- राजे अम्ब्रिशराव आत्राम
भारतीय जनता पार्टी हा एकावेळी दोन खासदारांचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा आज देशातच नव्हे तर जगभरात आपली एक ओळख निर्माण केली आहे, आज भाजपा देशाचा एक नंबरचा पक्ष म्हणून ओळखला जातो याचे मुख्य कारण म्हणजे बुथ प्रमुख व कार्यकर्ता, कार्यकर्त्यामुळे पक्ष मजबुतीकरणाला बळ मिळतो, म्हणून भाजपामध्ये बुथ प्रमुख म्हणजे हा पक्षाचा प्रमुख अंग आहे असे प्रतिपादन सिरोंचा येथील आयोजित बुथ सशक्तिकरण बैठकीदरम्यान गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणात राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सक्रियतेने आणि समर्पित भावनेने काम केल्यास पक्ष मजबूत होईल. आणि एकमेकांविरुद्ध मतभेद दूर करून सगळ्यांनी एकत्रित येऊन काम केल्यास आपल्याला यश प्राप्त होईल आणि येत्या काळातील सर्व निवडणुका आपण सहजपणे जिंकता येईल असे उपस्थित कार्यकर्त्यांना आव्हान केले, कार्यकर्त्यांना वर्तमान सरकारच्या लोकहिताच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच विद्यमान सरकारच्या योजनांच्या आधारे लोकांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यास सांगितले यावेळी मंचावर गडचिरोलीचे नेते आदिवासी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम राष्ट्रीय परिषद सदस्य सत्यनारायण मंचालवार माजी नगराध्यक्ष राजू पेद्दापेल्ली जिल्हा सचिव संदीप राचर्लावार तालुकाध्यक्ष शंकर नरहरी प्रामुख्याने उपस्थित होते,काल भारतीय जनता पार्टी सिरोचा बूथ सशक्तीकरण तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात महत्वाची बैठक काल सिरोंचा येथील राजा राजेश्वरा फंक्शन हॉल मोठ्या उत्साहात संपन्न झाले यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना आदिवासी जनजाती मोर्चा महामंत्री प्रकाशजी गेडाम मार्गदर्शन करताना भारतीय जनता पार्टीचे सिद्धांत,बूथ प्रमुखाचे महत्व आणि भारतीय जनता पार्टीचे विकास कामाचे आढावा देत विशेष मार्गदर्शन केले
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम सिरोंचा तालुका दौऱ्या दरम्यान प्रथम सिरोंचा येथे आयोजित दिव्यांग शिबिर येथे भेट देऊन उपस्थित रुग्णांना फळ वाटप केले व रुग्णांच्या व्यवस्थेची आढावा घेतले. त्यानंतर जुन्या पेन्शन मागणीसाठी आंदोलककर्त्यांना भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पूर्ण समर्थन देऊन मी माझ्या स्तरावर तुमच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांना दिले आणि त्यानंतर सिरोंचा मुख्यालयाजवळील नगराम गावातील गॅस सिलेंडर ब्लास्ट होऊन सर्वस्व गमावलेल्या कोडी कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयाला विचारपूस करून त्यांना आर्थिक मदत केले आणि अपघाताशी संबंधित शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आणि या अपघाताविषयी तहसीलदारांची चर्चा करून या कुटुंबीयाला लवकरात लवकर शासन स्तरावरून मदत करण्याचे अवगत केले या बैठकीला भाजपा सिरोचा कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, तसेच तालुक्यातील सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, जिल्हा , प्रदेशाचे पदाधिकारी व सदस्य,तालुका एवं तालुक्यातील सर्व शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख,सर्व आजी-माजी नगरसेवक, तथा जेष्ठ नेते यांनी आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष शंकर नरहरी यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन माधव कासर्लावार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संतोष पडालवार श्रीनाथ राऊत, दिलीप शेनिगरपू, सतीश पद्मटींटी रवी चकिनारापू, भास्कर गुडीमेटला, गजानन श्रीकांत शुगरवार आदींनी परिश्रम घेतले