मुलचेरा:-
तालुका कृषी अधिकारी मुलंचेरा यांच्यावतीने गुलाबी बोंड अळी निर्मूलन जनजागृती सप्ताहाचे आयोजन या अंतर्गत मौजा कोपरअली चेक कोपरअली माल आणि कोळसापूर येथे कृषी सहाय्यक प्रदीप मुंडे यांनी सहभाग घेऊन शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळी खोडकिड घानावरील करपा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व त्यांचे निर्मूलन करण्याचे उपाय शेतकऱ्यांना सांगितले यावेळी 6 ऑक्टोंबर 2022 रोजी होऊ घातलेल्या नैसर्गिक शेती कार्यशाळेबद्दल शेतकऱ्यांना माहिती देऊन नैसर्गिक शेती कशाप्रकारे करावी याबद्दल माहिती घेण्यासाठी या कार्यशाळेत शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित रहावे याबद्दल आवाहन करण्यात आले व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली यावेळेस मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.