ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

व्होटर कार्डला आधार कार्ड कसे लिंक करायचे ?

केंद्र सरकारने अलीकडेच मतदान ओळखपत्र (voter ID Card) हे आधार कार्डला लिंक (How To Link Voter ID Card With Aadhar Card 2022) करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत होणारे बोगस मतदान टाळणे तसेच मतदार यादीत मतदारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे pan card प्रमाणेच मतदान ओळखपत्र (Voter ID Card) देखील आता आधार कार्ड सोबत लिंक करावे लागणार आहे. तुम्हाला मतदान ओळखपत्र (Voter ID Card) देखील आता आधार कार्ड सोबत लिंक करायचे असल्यास त्याबाबतची माहिती या लेखात दिलेली आहे. चला तर मग बघू या मतदान ओळखपत्र (Voter ID Card)  आधार कार्ड सोबत लिंक कसे करावे.

मतदान ओळखपत्र (Voter ID Card) आधार कार्ड सोबत लिंक करण्याच्या दोन पद्धती आहेत. National Voter Service Portal यावर जाऊन तुम्ही मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करू शकता.

National Voter Service Portal वर मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करायचे असल्यास त्यासाठी या पोर्टलवर तुमचे अकाऊंट असणे गरजेचे आहे.

दुसरी पद्धत म्हणजे SMS द्वारे ही तुम्ही मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करू शकता.

<मतदान ओळखपत्र क्रमांक><आधार कार्ड क्रमांक> या पद्धतीने sms टाईप करून 166 किंवा 51969 या नंबरवर sms करावा.