ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुलचेरा तालुक्यातील समर (टिल्लू)मोंटू मुखर्जी सह बीआरएसचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत (उबाठा)जाहीर प्रवेश

मुलचेरा :-मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवून मा.महेश केदारी जिल्हासंपर्कप्रमुख गडचिरोली व रियाज शेख जिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनात शिवाजीराव खोडदे पाटील साहेब अहेरी विधानसभा संपर्कप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उपजिल्हाप्रमुख अरुणभाऊ धुर्वे, विधानसभा संघटक बिरजूभाऊ गेडाम, युवासेना दिलीपभाऊ सुरपाम यांच्या अथक प्रयत्नाने मुलचेरा तालुक्यातील समर (टिल्लू)मोंटू मुखर्जी सह बीआरएसचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत (उबाठा)प्रवेश केले. यामुळे मुलचेरा तालुक्यात शिवसेनेला अधिक बळ मिळाले असून येणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत याचे परिणाम बघण्यास मिळेल. समर (टिल्लू)मुखर्जी सह सौं मिनू मुखर्जी, माजी प. स. उपसभापती, सौं पुष्पाश्री मुखर्जी ग्रामपंचायत सदस्य, विवेकानंदपूर, बाबुल दास, माजी माजी सरपंच, सौं रंजिता तपण पांडे, माजी सरपंच, अमर भक्त, कुनेंदू मंडल, गौतम व्यापरी, तथा इतर या सर्वांना मा शिवाजीराव खोडदे पाटील यांनी शिवबंधन बांधून प्रवेश केले.

यावेळी नीलकमल मंडल शिवसेना तालुका प्रमुख तसेच विधानसभा समन्वयक स्वर्णसिह डांगी, राहुल सरकार युवासेना उपतालुका प्रमुख, सचिन आर्के, सागर तुमरेट्टी व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते…

यावेळी शिवाजीराव खोडदे पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून आपला शिवसेना पक्षामध्ये योग्य तो सन्मान केला जाईल येणारे दिवस हे आपलेच आहेत त्यामुळे अपन प्रत्येकानी गावागावामध्ये जाऊन शिवसेनेचा विचार सामान्य माणसा पर्यंत पोहोचवावा अशे आवाहन केले..

यावेळी त्यांनी दिलीप सुरपाम,अरुण धुर्वे सर,बिर्जू गेडाम यांच्या विशेष प्रयत्नामुळे हा शिवसेनेत प्रवेश करण्यात आला …

त्यामुळे त्यांचे देखील विशेष अभिनंदन केले….

लवकरच मुलचेरा तालुक्यातील अनेक क्षेत्रातील मंडळी प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत…