सिरोंचा तालुक्यात भव्य दिव्यांग मेळावा संपन्न
अखेरच्या शिबिरातही माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांचा मोलाचा वाटा
सिरोंचा :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवीवर्षानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी मिशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग, रिसर्च अँड ॲक्शन (मित्र) फाउंडेशन तथा जिल्हा परिषद गडचिरोली (समाज कल्याण, आरोग्य आणि शिक्षण विभाग) तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहीम कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे 10 मार्च रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले.गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात 16 मार्च रोजी अखेरचा शिबिर घेण्यात आला याही शिबिरात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांचा मोलाचा वाटा दिसून आला.
शिबिरामध्ये माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिरोंचा येथील कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन दिव्यांगांची सुश्रुषा केली. यामध्ये दिव्यांगांना रोड वरून विल चेअर मध्ये बसवून योग्य विभागाकडे नेणे, त्यांचे फॉर्म भरण्यात मदत करणे, कागदपत्र व्यवस्थित लावून देणे, दिव्यांगांना वाहनापर्यंत सोडून देणे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या नोंदी घेणे विविध कार्यात सहभागी होणे व मदत करण्याकरिता शिबिराला हातभार लावला.प्रत्यक्ष उपस्थित राहून दिव्यांग बांधवांची गैरसोय होणार नाही याची ताईंनी काळजी घेतली.
सिरोंचा परिसरातील सर्व प्रकारातील दिव्यांगांना मदत व्हावी म्हणून सिरोंचाचे तहसीलदार जितेंद्र शिक्तोडे.गटविकास अधिकारी डॉ.विकास घोडे,एकात्मिक बाल विकास अधिकारी ए.एच.पटले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अश्विन वलके आदी अधिकारी व कर्मचारी अधिकारी व कर्माऱ्यांनी मदत केले. माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर कोलुरी,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष,एम.डी.शानू, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष सत्यम पिडगू, राष्ट्रवादी तालुका कोष्याअक्ष मदनय्या मादेशी, देवा येंनगंदुला नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक सतीश राचरलावार, नगरसेवक रंजित गागापूरपवार, नगरसेवक जगदिश राल्लाबंडीवार, नगरसेविका सपना तोकला, नगरसेविका महेश्वरी पेद्दापल्ली, उपसरपंच मेडारंम सत्यम ठाकूर,नावेद खान,अफरोज सय्यद, आदी मान्यवर उपस्थित होते.
सिरोंचा येथे आयोजित शिबिरातील पात्र दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन व ऑनलाईन पोर्टल द्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र आणि शासनाच्या विविध योजनांची माहितीपत्रक स्पीड पोस्ट ने घरपोच देण्यात येणार आहे तसेच लवकरच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य, उपकरणे देण्यात येणार असल्याची माहिती मित्र संस्थेचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
दिव्यांग शिबिर यशस्वीतेसाठी भाग्यश्री ताईंचा मोलाचा वाटा
गडचिरोली जिल्ह्यात 20 फेब्रुवारी पासून 16 मार्चपर्यंत एकूण 18 ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी शिबिर घेण्यात आले. अहेरी विधानसभेतील मुलचेरा, आलापल्ली, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाच ठिकाणी तसेच गडचीरोली जिल्हा मुख्यालयात घेण्यात आलेल्या दिव्यांग शिबिरासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी करून दिव्यांग शिबिर यशस्वी करण्यासाठी मदत केले हे विशेष.