मुलचेरा:03 ऑक्टोबर 2023 विवेकानंद पूर जिल्हा गट आणि मुलचेरा गट्टा येथे मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने श्री विनायकजी राऊत पूर्व विदर्भ संपर्क नेते श्री प्रकाश वाघ पूर्व विदर्भ समन्वयक श्री महेशजी केदारी गडचिरोली संपर्कप्रमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, श्री शिवाजीराव खोडदे पाटील अहेरी विधानसभा संपर्कप्रमुख श्री रियाज शेख जिल्हाप्रमुख अहेरी विधानसभा यांच्या नेतृत्वात सर्वप्रथम शेकडो महिला व पुरुषांनी शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी शासनाने कागदावर राबवत असलेल्या योजनाच्या विरोधात शासनाच्या तीव्र निषेध करीत अच्छे दिन आले का ?? बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला का? 15 लाख खात्यात जमा झाले का? विदेशातून काला धन परत आला का? शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या दीडपट भाव मिळाला का? असे प्रश्न उपस्थित करीत जिल्हाप्रमुख रियाज शेख केंद्र शासन व राज्य शासनाचे भांडाफोड केले आगामी निवडणुकीत पुन्हा तुमच्याजवळ लोकप्रतिनिधी मत मागायला आल्यास आपण जनतेने लोकशाही मार्गाने प्रश्न विचारावे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जोपर्यंत प्रश्न उपस्थित करीत लोकप्रतिनिधींना सवाल करीत नाही तोपर्यंत अहेरी विधानसभा च्या विकास होणार नाही हक्कासाठी मुलांच्या भविष्यासाठी शिका संघटित व्हा संघर्ष करा असा मूलमंत्र श्री रियाज शेख यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले . श्री शिवाजीराव खोडदे पाटील विधानसभा संपर्कप्रमुख यांनीही होऊ द्या चर्चा करूया शासनाच्या भांडाफोड निवड शासन योजना जाहीर केले त्याची प्रसिद्धी सुद्धा केली परंतु याच्या लाभ सर्वसाधारण जनतेला मिळत नाही अनेक योजना पासून ग्रामीण व शहरी भागातील लोक वंचित आहे राज्याची परिस्थिती बिकट असताना युवकांच्या हाताला काम नसताना सतत राज्यात बेरोजगारी वाढत असताना सुद्धा सध्या राज्यात तीन तिघाडा काम बिघाडा शासन आपली खुर्ची वाचवण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण करीत असल्याने जनतेचा रोष या शासनावर असल्याने म्हणूनच महानगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद निवडणूक घेत नाही ही घटनाबाह्य सरकार घाबरलेली आहे असे आपल्या मार्गदर्शनात श्री शिवाजीराव खोडदे पाटील आपले मत व्यक्त केले संचालन व प्रास्ताविक मार्गदर्शन दिलीप सुरपाम युवासेना जिल्हा अधिकारी यांनी केले. प्रमुखअतिथी म्हणून बिरजू गेडाम विधानसभा संघटक, मुलचेरा तालुकाप्रमुख नीलकमल मंडल, ग्रामीण तालुकाप्रमुख संजय मंडल , यांच्या प्रमुख उपस्थितीत अमेंद्र मुखर्जी अमर मंडल प्रणव फौजदार रमणी मंडल भिमान माझी तपन विश्वास गोविंद बैरागी शिवेश्वर दे विवेक हलदार सुनील मांझी सदानंद विश्वास बकिम चंद्र दास सुमित्रा मुखर्जी प्रतिका राय भगवती मंडल निकिता मंडल मंडल दीपिका मंडल सुनिता मोहनदा मानती बाई कुळयामी कांताबाई मडावी आशिया मोहनदा वैशाली मोहनदा शंकर मोहनदा गणपत मोहनदा विकास गुडिया मी पांडुरंग नरोटे पुरुषोत्तम नरोटे किशोर वेदा अनिल मोहनदा देवाजी मोहनदा विजय मोहनदा घोषु नरोटे अक्षय मोहनदा नागेंद्र गोवासे बकिम चंद्र दास असे शेकडो महिला आणि पुरुषाने यावेळी शिवसेनेत प्रवेश केले
Related Articles
‘बार्टी’ मार्फत फेलोशिपसाठी ऑनलाइन अर्ज सुरु ! Apply Online for Barti Fellowship
सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF-2021) अंतर्गत दिनांक 01 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत कायम नोंदणी (Confirmed Registration) असणाऱ्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये नामांकित विद्यापीठामधून पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या परंतु नोंदणी न झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. […]
(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये 72 जागांसाठी भरती
Bank of Baroda Recruitment 2022 Bank of Baroda Recruitment 2022 (Bank of Baroda Bharti 2022) for 72 Professionals / Business Managers / AI & ML Specialists Posts. Total: 72 जागा पदाचे नाव: प्रोफेशनल्स /बिजनेस मॅनेजर/ AI & ML स्पेशलिस्ट शैक्षणिक पात्रता: (i) BE/ B.Tech/B.Sc – IT/ B.Sc(कॉम्प्युटर सायन्स)/ BCA / MCA/CA (ii) 03/04/05 वर्षे अनुभव वयाची अट: 01 सप्टेंबर 2022 […]
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना : मोफत अन्नधान्य वाटप योजनेला मुदतवाढ
समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांविषयीची चिंता आणि संवेदनशीलता जपत, त्यांना आधार देण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (PM-GKAY) आणखी सहा महीने म्हणजेच, सप्टेंबर 2022 पर्यंत (सहावा टप्पा) मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली. या योजनेचा पाचवा टप्पा, मार्च 2022 मध्ये संपणार आहे. पीएम-जीकेएवाय ची […]