ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आय. टी.आय. प्रवेशासाठी समुपदेशन फेरी ३० ऑगस्ट रोजी

मुलचेरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत चौथ्या फेरी अखेरीस रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरी द्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेले उमेदवारसाठी समुपदेशन फेरी ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. याकरिता नोंदणी केलेल्या तसेच अप्रवेशित उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील व्यवसाय निहाय रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात लॉगिन करून दिनांक २७ ते २८ ऑगस्ट पर्यंत संस्थास्तरीय समुपदेशन फेरीकरीता नोंदणी करावी.
गुणवत्ता क्रमांक नुसार आणि प्रवेशकरिता उपलब्ध जागा, उमेदवार मागणी नुसार जागांचे वाटप करण्यात येईल. सदर समुपदेशन फेरीत जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवाराने सर्व मूळ प्रमाणपत्रसह येत्या ३०/०८/२०२३ रोजी सकाळी ८ वाजेपासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिलेल्या मुदतीत उमेदवारांनी प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावी असे सर्व.प्राचार्य श्री. ए. डी. शेंडे यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेतील प्रवेश समन्वयक श्री. एस. ए. फुले शिल्प निदेशक यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क करावे. आय. टी. आय. प्रशिक्षणार्थ्याना मिळणार आता चाळीस ऐवजी पाचशे रूपये विद्यावेतन आय. टी. आय. प्रशिक्षणार्थ्याचे विद्यावेतन ४० रूपये वरून पाचशे रुपये करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाने घेतला असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. कमी उत्पन्न गटातील प्रशिक्षणार्थ्याना या निर्णयाचा लाभ मिळणार असून व्यवसाय प्रशिक्षणासाठी संस्थेत प्रवेश घेऊन कौशल्य प्राप्त करावे तसेच समुपदेशन प्रवेश फेरीचा लाभ घ्यावा असे मत प्रभारी प्राचार्य श्री. आर. एस. देठेकर यांनी व्यक्त केले.