ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

तुमच्याकडे आधार कार्ड व रेशन कार्ड असेल तर पटकन हे काम करून घ्या, नाहीतर रेशन बंद!

 

देशभरात केंद्र आणि राज्य सरकारकडून  मोफत रेशन आणि स्वस्त रेशनची सुविधा दिली जाते, पण आता यु आय डी ए आय ने देशातील करोडो लोकांना एक मोठी भेट दिली आहे. तुम्हीही मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. देशातील आधार जारी करणारी संस्था यु आय डी ए ने म्हटले आहे की, आता तुम्ही देशभरात आधारद्वारे रेशन घेऊ शकता आणि यासाठी तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. यु आय डी ए ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

यु आय डी ए ने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, आता तुम्ही आधारद्वारे संपूर्ण देशात कुठेही रेशन घेऊ शकता, परंतु यासाठी तुमचे आधार अपडेट करणे आवश्यक आहे. वन नेशन वन आधार कार्यक्रमाद्वारे तुम्ही आधार कार्डवरून देशभरात रेशन घेऊ शकता. तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्राशी संपर्क साधू शकता.

 दरम्यान घरातील कामापासून ते बँकेपर्यंतची सर्व कामे आधारद्वारे करता, त्यामुळे ते अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला आधारशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, तुम्ही टोल फ्री क्रमांक 1947 वर देखील संपर्क साधू शकता. येथे तुम्हाला आधारशी संबंधित सर्व माहिती मिळेल.