ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

1 जानेवारीपासून होणार महत्त्वाचे बदल ?

प्रत्येक नवीन वर्ष आपल्यासोबत काही नवे बदल घेऊन येतो, जे सर्वसामान्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात, 1 जानेवारी 2023 पासून काही महत्त्वाचे नियमही बदलणार आहेत. यामध्ये क्रेडिट कार्ड, बँक लॉकर्स, जीएसटी ई-इनव्हॉइसिंग, सीएनजी-पीएनजीच्या किमती आणि वाहनांच्या किमतींशी संबंधित बदलांचा समावेश आहे.

पहा काय आहेत बदल

▪️ रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी बँक लॉकरसंबंधित नवे नियम जाहीर केले,लॉकरबाबत बँकेला ग्राहकांना लॉकरच्या नियमांमध्ये झालेल्या बदलाची माहिती एसएमएस आणि इतर माध्यमातून द्यावी लागेल.

▪️ 1 जानेवारी 2023 पासून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार असून हा बदल क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंटशी संबंधित असेल.

▪️ सरकारने 2023 पासून जीएसटीच्या ई-इनव्हॉइसिंगसाठी 20 कोटींची मर्यादा 5 कोटीपर्यंत कमी केली आहे. हा नवीन नियम 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार

▪️ गेल्या काही काळात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत असल्याने, नवीन वर्षात सरकारी तेल कंपन्या घरगुती गॅसच्या (एलपीजी) किमती कमी करू शकते

▪️ पेट्रोल-डिझेलच्या किमतींसोबतच वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजी पीएनजी गॅसच्या किमतीतही बदल होऊ शकतो.