गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

सिरोंचा तालुक्यात आदिवासी विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार

माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली दोन्ही पक्षाच्या ३०० कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सह अनेक प्रमुख नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याने दोन्ही विरोधी पक्षात उडाली मोठी खडबड

सिरोंचा :-
तालुक्यातील टेकडा येते काल झालेल्या भव्य प्रवेश कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली आदिवासी विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जाफ्राबाद, टेकडा, बेज्जूरपल्ली, मादारम येतील तब्बल ३०० कार्यकर्त्यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला, दोन्ही पक्षातून आलेल्या सर्व नेत्यांचे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राजे साहेबांनी भाजपाचा दुपट्टा व हार टाकून स्वागत केले..!!
प्रवेश करणाऱ्या मद्ये आविसचे जेष्ठ कार्यकर्ते सुधाकर पेद्दी, पंचायत समितीचे सदस्य सरिता पेद्दी, जाफ्राबादचे सरपंच बापू सडमेक, महेश दुर्गम, महाकाली कोटा, कुंकुमय्या सोदारी,शेखर तन्नीर, मारया निलम, स्वप्निल पेद्दी, मधुकर गादे, साम्बय्या बोरकुट, प्रसाद कटकु सह पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सह कार्यकर्त्यांनी आविस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातुन भारतीय जनता पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश केल्याने दोन्ही पक्षात मोठी खड़बड उडाली आहे, पूर्ण अहेरी विधानसभा क्षेत्रात ह्याची सद्या जोरदार चर्चा होत आहे..!!
टेकडा गावात मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे आगमन होताच पारंपरिक ढोल आणि बाजे वाजवून गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले, त्यानंतर झालेल्या भव्य प्रवेश कार्यक्रमात बोलतांना गेल्या ३ वर्षात विकासाचे एकही काम झाले नाही, आजही आम्ही केलेलेच विकासकामे प्रगतीपथावर आहेत, नेत्यांनी प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार केला मनुनच जनतेमध्ये अश्या नेत्याबद्दल मोठी नाराजी दिसून येत आहे, परंतु ज्या विश्वासाने तुम्ही आमच्या पक्षात आले आहे तुमचा विश्वासघात मी कदापी होहू देणार नाही असे प्रतिपादन ह्यावेळी राजे साहेबांनी केले.
ह्या प्रवेश कार्यक्रमात जेष्ठ नेते रंगू बापू, प्रकाश गुडेल्लीवार, भाजपा सिरोंचा तालुकाध्यक्ष शँकर नरहरी, अहेरी तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, संदीप राचेर्लावार, गजानन कालक्षपवार, संतोष पडालवार, मल्लण्णा संगरती, मधुकर निलम, राजू पेदापल्ली,राजेशम काशेट्टी, श्रीनिवास ओल्लाला, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, संतोष उरेते, माधव कासर्ला सह जाफराबाद व टेकडा परिसरातील नागरिकांची शेकडोच्या संख्येने उपस्थिती होती.