गडचिरोली येथे झालेल्या राज्य सरकारच्या विरोधात खऱ्या आदिवासींच्या चक्काजाम आंदोलनात
अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद,मुलचेरा/अहेरीचे पदाधिकारी सहभागी
गडचिरोली:- आज दिनांक १ ऑक्टोंबर रोजी राज्य सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील आदिवासींच्या आरक्षणामध्ये धनगर अथवा अन्य कोणत्याही जातीचा समावेश करू नये, राज्य सरकार द्वारा सरकारी शाळांचे व शासकीय नौकऱ्यांचे खासगीकरण व कंत्राटीकरण करणारा जीआर तात्काळ रद्द करा, नवीन वनसंशोधित व वनसंरक्षण २०२३ कायदा रद्द करा, पेसा कायदा यासह विविध मागण्या घेऊन आज सकाळी दहा वाजतापासुन गडचिरोली शहरात सर्व आदिवासी संघटना, ग्रामसभा व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील आदिवासींमध्ये सरकारबद्दल प्रचंड अस्वस्थता आहे. अशातच धनगर आरक्षणाचा मुद्दा अधीक चिघळत असताना त्यांना आदिवासींमधुन आरक्षण देण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आज रविवारला जिल्हाभरातील दहा हजारावर आदिवासींनी गडचिरोली शहरात एकत्र येत आंदोलन सुरू केले. आंदोलकांनी राणी दुर्गावती चौकातून मोर्चा काढत इंदिरा गांधी चौक येथे येत जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलकांनी चक्का जाम केल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था दोन तासांहून अधिक काळ ठप्प पडली होती. या आंदोलनात अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा/ अहेरीच्या पदाधिकारी आंदोलनाला पाठिंबा देत सहभागी झाले. यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतिश पोरतेट, वासुदेव मडावी सर रमेश कुसनाके सर,राकेश मरापे,प्रभाकर मरापे,अश्विन मडावी,गज्जू आत्राम,शिनु सिडाम, महेंद्र आत्राम,यांच्यासह असंख्य आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.