मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. शीतल सावनकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूजऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. ८, बुधवार दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० यावेळेत प्रसारित होईल.
वंध्यत्व काय आहे, यावर असणारी प्रभावी उपचार पद्धती, आरोग्याची घ्यावयाची काळजी अशा विविध विषयावरील उपयुक्त माहिती डॉ. सावनकर यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.