मुंबई, दि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ व सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे कुलगुरु तथा मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर‘ या ॲपवर शुक्रवार दि. १८ व शनिवार दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.
दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ रोजी शिवाजी विद्यापीठ हीरक महोत्सवी वर्धापनदिन साजरा करत आहे. यानिमित्त शिवाजी विद्यापीठामध्ये विद्यार्थी हिताला प्राधान्य देत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम, संशोधन क्षेत्रातील योगदान, इनोव्हेशन आणि स्टार्ट अप संदर्भातील काम, नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, जलसंवर्धन व सामाजिक कार्य, सध्याच्या स्पर्धात्मक युगात वावरताना विद्यार्थ्यांची भूमिका अशा विविध विषयांवर कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी विस्तृत माहिती ‘दिलखुलास‘ कार्यक्रमातून दिली आहे. कोल्हापूरच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.