राजवाड्यात मोठ्या भव्य-दिव्य उत्सवाचे स्वरूप..!!
अहेरी इस्टेटच्या राजमाता, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य तथा विदर्भातील नामांकित धर्मराव शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा राजमाता राणी रुक्मिणी देवी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या रोषणाई,आतिषबाजी,ढोल-ताशाच्या गजरात तसेच रेल्ला नृत्य करीत संपूर्ण अहेरी राजनगरी दुमदुमली.
अहेरी उपविभागातील राजघराण्याशी संबंधित गणमान्य व्यक्ती, स्थानिक व्यापारी संघटना,विविध सामाजिक संस्थांची तथा पक्षांचे पदाधिकारी तसेच धर्मराव शिक्षण मंडळातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व नगरातील वार्डा- वार्डातील महिलांनी पुष्पगुच्छ व भेट देऊन राज माता राणी रुक्मिणी देवी यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव केला.
अहेरी राजमहालाच्या प्रांगणात आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांचे सुपुत्र माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री श्रीमंत राजे अमरीशराव महाराज, कुमार अवधेशराव बाबा, राजमाताच्या लहान बहीण राजकुमारी विजयश्री सिंह,प्रवीणराव बाबा,चित्तेश्वर बाबा,विश्वनाथबाबा आत्राम, वैभव सोमकुवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी राज घराण्याशी संबंधित निष्ठावंत प्राचार्य डॉ. मनोरंजन मंडल, प्राचार्य मारोती टिपले,संतोष उरेते,गिरीश मद्देरलावार,प्राचार्य अनिल भोंगळे,प्राचार्य संजय कोडेलवर, सेवानिवृत्त प्राचार्य विजय खोंडे,प्राचार्य अरुण गोटेफोडे,प्राचार्य तगरे,मुख्याध्यापक तालिब सय्यद,मुख्याध्यापक अनिल यावले, मुख्याध्यापक वांढरे, मुख्याध्यापक दीपक राय व दिलीप राय, मुख्याध्यापक प्रभाकर भुते, मुख्यध्यापक उराडे, प्रा रमेश हलामी, प्रा.तानाजी मोरे,प्रा.अतुल खोब्रागडे, प्रा.गोंडे ,पर्यवेक्षक युवराज करडे, पर्यवेक्षक हंसराज खोब्रागडे,आदर्श राज्यस्तरीय शिक्षिका जयश्री विजय खोंडे, व्यापारी संघटनेतील इतर सदस्यगण, प्रकाश गुड्डेल्लीवार,रवी नेलकुद्री,अमोल गुड्डेल्लीवार,संतोष मद्दीवार, विनोद जिल्लेवार, विकास तोडसाम, राकेश कोसरे,नगरसेवक विकास उईके,माजी नगरपंचायत अध्यक्ष हर्षताई रवींद्र ठाकरे,नगरसेविका शालिनी पोहणेकर, नगरपंचायतचे आजी-माजी नगरसेवक,भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली तथा अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
राज घराण्याकडून आलेल्या शुभचिंतकांसाठी हिंगणघाट येथील डोंगरे यांच्या भक्तीगीत पर सुगमसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच समस्त राज घराण्यातील “अहेरीचा राजा” गणेश मंडळाला भेट देणाऱ्या भक्तांसाठी व शुभेच्छांसाठी महाप्रसादाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. या कार्यक्रमाला एकंदरीत दोन हजार संख्येने हजेरी लावली होती.राजमाता राणी रुक्मिणी देवी यांनी सर्व आप्तेष्टांच्या शुभेच्छांचा वर्षाव स्वीकारून असेच प्रेम राजघराण्याशी ठेवण्याचे आवाहन करून सर्वांना मनपूर्वक धन्यवाद दिला..!