ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘दिलखुलास’ कार्यक्रमात जे. जे. रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची १६ व १७ नाेव्हेंबर रोजी मुलाखत

बई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जे. जे. रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार, दि. 16 व गुरुवार दि.17 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

मुंबई, भिवंडी, मालेगाव परिसरात गोवरचा प्रादुर्भाव वाढला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना करत आहे. या उपाययोजनांची माहिती, रोगाची लक्षणे, रोग होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, लसीकरण अशा विविध विषयांवर जे. जे. रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी विस्तृत माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.