गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

ओपनस्पेस सौंदर्यीकरणाचे ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण

अहेरी:-नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक १ मधील खमनचेरू रोड लगत नुकतेच झालेल्या ओपनस्पेस सौंदर्यीकरणाचे लोकार्पण अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम,माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,नगराध्यक्ष रोजा करपेत,उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, बांधकाम सभापती नौरास शेख, पाणीपुरवठा सभापती लक्ष्मी मद्दीवार, महिला व बालकल्याण सभापती मीना ओंडरे,कंत्राटदार अरुण मुक्कावार, मुख्याधिकारी एन सी दाते,नगरसेवक अमोल मुक्कावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,प्रशांत आईचवार,श्रीकांत मद्दीवार,शंकर कटलावार,राहुल दुर्गे,अफसर खान,ताजू कुळमेथे,इमाम शेख,राजू आत्राम,तिरुपती पाले,सुमित मुडावार आदी उपस्थित होते.
नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना ( पुनर्विनियोजन) सन २०२०-२१ अंतर्गत तब्बल ७५ लाख ०९ हजार ७३४ रुपयांची निधीतून प्रभाग क्रमांक १ जवळ खमनचेरू रोड लागत ओपनस्पेस सौंदर्यीकरण करण्यात आले.अत्यंत सुंदर आणि उत्कृष्ट असे याठिकाणी सौंदर्यीकरण करण्यात आल्याने अहेरीकरांना आता याठिकाणी मोकळा श्वास घेता येणार आहे.विशेष म्हणजे सध्या सर्वत्र प्रदूषण वाढल्याने घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे.अहेरी लगत कुठेही पार्क नसल्याने नगर पंचायतीने पुढाकार घेऊन याठिकाणी ओपनस्पेस सौंदर्यीकरण करण्याचे ठरविले,त्यामुळे लहान मुलांना,महिलांना तसेच वयोवृद्धांना याठिकाणी काही काळ वेळ घालवता येणार आहे.
मागील काही महिन्यांपासून याठिकाणी बांधकाम करून सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू होते.नुकतेच काम पूर्ण होताच गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण करून अहेरीकरांसाठी ते खुले करण्यात आले.