ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

देशात हवा प्रदूषणाचा वाढता धोका; प्रदूषणामुळे भारतीयांचे आयुष्य होतंय 5 वर्षांनी कमी

जगभरात हवा प्रदूषणाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या अहवालात सांगितल्याप्रमाणे हवा प्रदूषणाच्या समस्येचा दक्षिण आशियातील लोकांच्या आयुर्मानावर गंभीर परिणाम झाला आहे. हवा प्रदूषणामुळे त्यांचे आयुष्य 5.1 वर्षांनी कमी झाले आहे. त्यामध्ये बांगलादेश, भारत, नेपाळ व पाकिस्तानसारख्या देशांतील लोकांचा समावेश आहे.

‘एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स’ 2023 नुसार शिकागो विद्यापीठाच्या ‘एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट’ने 29 ऑगस्ट रोजी हा अहवाल सादर केला होता. या अहवालात प्रदूषणामुळे लोकांच्या आयुर्मानावर होणाऱ्या परिणामविषयी सांगितले. तंबाखूच्या सेवनामुळे या देशांतील लोकांचे आयुष्य 2.8 वर्षांनी कमी होते. यावरून तुमच्या लक्षात येईल की, हवा प्रदूषणाचा धोका हा तंबाखूच्या सेवनापेक्षा जास्त आहे.

हवा प्रदूषणाचा सर्वांत जास्त धोका असणाऱ्या दक्षिण आशियाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. उदा. हवा प्रदूषणामुळे व्यक्तीचे सरासरी आयुष्य 5.3 वर्षांनी कमी होत आहे. त्याशिवाय या समस्येमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचा धोका वाढला आहे. आरोग्य समस्यांमुळे भारतीयांचे आयुष्य जवळपास 4.5 वर्षांनी कमी होत आहे.