ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

नाविन्यपूर्ण योजना दुधाळ संकरित/ देशी गाई/म्हशीचे गट वाटप योजनेकरीता निधी वितरित – 2021-22

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना दुधाळ संकरित/देशी गाई/म्हशीचे गट वाटप अंमलबजावणीकरीता अनुसूचित जाती घटकांसाठी सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पित निधीतून बीडीएस प्रणालीवर निधी वितरित करणेबाबत शासन निर्णय जारी केला आहे.

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना दुधाळ संकरित/देशी गाई/म्हशीचे गट वाटप अंतर्गत सन २०२१-२२ करिता मागणी क्र. एन -३ लेखाशिर्ष २४०३ डी ७२२, ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखाली रु.८००.०० लाख निधी अर्थसंकल्पित असून त्यापैकी रु. २४०.०० लाख एवढा खर्ची झालेला निधी वजा जाता रु. ५६०.०० लाख इतकी तरतूद उपलब्ध आहे.

वित्त विभागाच्या खालील शासन निर्णयातील संदर्भाधीन क्रमांक १. च्या परिपत्रकांन्वये राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली महामारीची परिस्थिती विचारात घेऊन निधी वितरणाकरीता शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

या अनुषंगाने कृषी व पदुम विभागाच्या खालील शासन निर्णयातील संदर्भाधीन क्र. २ च्या नस्तीवर वित्त विभागाने दिलेल्या सहमतीस अनुसरुन सन २०२१-२२ मध्ये राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत अनुसूचित प्रवर्गाकरीता ०६/०४/०२ दुधाळ संकरित/देशी गाई/म्हशीचे गट वाटप करणे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन २०२१-२२ आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय निधीतून लेखाशिर्ष २४०३ डी ७२२ खाली उर्वरीत रु. ५६०.०० लाख इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून प्रधान सचिव (कृषी व पदुम) विभाग, मंत्रालय, मुंबई यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) वितरीत करण्यास मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. सदर वितरीत निधी खर्च करतांना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पध्दतीने काटकसरीच्या उपाययोजना करुन खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी.

तसेच उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय/ उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, समाजकल्याण, संबंधित प्रादेशिक उप आयुक्त, सामाजकल्याण, सामाजिकन्याय व विशेष सहाय्य विभाग व कृषी व पदुम विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत दक्षता घ्यावी.

विभाग प्रमुख/नियंत्रक अधिकारी यांनी अनुसूचित जाती घटकांसाठीचा निधी त्याच घटकांवर खर्च होईल याची दक्षता घ्यावी, जेणेकरुन शासनाला या योजनांवर होणाऱ्या खर्चावर संनियंत्रण ठेवता येईल.

सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आलेला निधी खर्च करतांना विभागप्रमुख तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या खालील शासन निर्णयातील संदर्भाधीन दि. २८.१.२०२२ व दि. ३.२.२०२२ च्या शासन परिपत्रकातील दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावी.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या खालील शासन निर्णयातील संदर्भाधीन दि. २८.१.२०२२ व दि. ३.२.२०२२ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारात आणि वित्त विभागाचा अनौपचारीक संदर्भ क्र. १८०/व्यय -१४ दि. २५.०२.२०२२ अन्वये प्राप्त सहमतीस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय: राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना दुधाळ संकरित/ देशी गाई/म्हशीचे गट वाटप अंमलबजावणीकरीता अनुसूचित जाती घटकांसाठी सन 2021-22 च्या अर्थसंकल्पित निधीतून बीडीएस प्रणालीवर निधी वितरित करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.