ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बांधकाम कामगारांकरिता सूचना

गडचिरोली: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदित जिवीत (सक्रिय) बांधकाम कामगारांकरिता 32 विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. सदर योजनांमध्ये सामाजिक सुरक्षा, आर्थिक सहाय्य, आरोग्य व शैक्षणिक सहाय्य योजनांचा समावेश होतो.

दि. 23.07.2020 पासून नोदंणी, नुतणीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे कामकाज ऑनलाईन प्रणालीद्वारे मंडळाच्या www.mahabocw.in या संकेतस्थळावर सुरू झाले आहे, त्यानुसार बांधकाम कामगारांचे ऑनलाईनद्वारे प्राप्त नोंदणी, नुतणीकरण अर्जाची तपासणी करण्यात येऊन सदर बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड व नुतणीकरण पावती वाटप करण्यात येते. तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या अर्जाची तपासणी करून पात्र अर्ज ऑनलाईनद्वारे लाभ वाटपाकरीता मंडळाकडे सादर करण्यात येऊन मंडळामार्फत थेट DBT पध्दतीने लाभ बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतो, तथापि सदरची कामे करून देण्याबाबत काही खाजगी व्यक्ती/ दलाल हे कामगारांकडून पैसे घेत असल्याचे निर्देशनास आल्याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केलेला आहे.
सबब सर्व बांधकाम कामगारांना आवाहन करण्यात येते की, या कार्यालयांतर्गत कोणतेही अधिकृत दलाल कार्यरत नाही तसेच अशा कोणत्याही आमिषाला अथवा दबावास बळी पडू नये व अशा बाबी निदर्शनास आल्यास तातडीने लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अथवा जिल्हा कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा. असे उप जिल्हा कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तथा सरकारी कामगार अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.