ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बौद्धिक संपदा अधिकार : कॉपीराइट आणि पेटंट वर कार्यशाळा सपंन्न

मुलचेरा : स्थानिक वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा अंतर्गत वनस्पस्ती शास्त्र व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ” बौद्धिक संपदा अधिकार : कॉपीराइट आणि पेटंट” यावर एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ ला आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी रिसोर्स पर्सन म्हणून नामवंत विषय तज्ञ डॉ. मंजू दुबे ग्रंथपाल आर एस मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालय नागपूर यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यशालेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंजित मंडल यांनीं केले.

यावेळी आपले सादरीकरण करतांना डॉ. मंजू दुबे मॅडम यांनी बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे ” जेव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्था आपल्या बुद्धीचा वापर करून एखादी निर्मिती करते तेव्हा त्या निर्मितीवर मर्यादित काळापुरती झालेली मक्तेदारी ” असे स्पस्ट मत त्यांनी आपल्या सादरीकरणाद्वारे मांडले . तसचे त्यांनी आपल्या सादरीकरणात बौद्धिक संपदा अधिकार निर्मितीवरचे कॉपीराइट (स्वामित्व हक्क), उत्पादनाची ओळख पटविणारे ट्रेडमार्क , औद्योगिक मालमत्ता: कॉपीराइट एखाद्या घटकाला डिझाइनचे संरक्षण, भौगोलिक संकेत, सेमीकंडक्टर इंटिग्रेटेड सर्किट्स लेआउट व पेटंट यासारखे विविध प्रकार असून त्यांनी कॉपीराइट (स्वामित्व हक्क), व पेटंट दोन विषयावर सादरीकरयाद्वारे स्पस्ट केले. त्यानंतर सहभागी महाविद्यालय ग्रंथपाल , प्राध्यापक , संशोधक विद्यार्थीच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

कार्यशाळेला सर्व भागातून जवळपास ३६७ सहभागी नोंदणी केली त्यात पुरुष सहभागी (६८%) महिला सहभागी (३२ %), तर महाविद्यालयीन ग्रंथपाल (४०%), सहयोगी प्राध्यापक (३१%) इतर (२९%) यांचा सहभाग होता . कार्यशाळेंचे सूत्रसंचालन डॉ हरिशीव प्रसाद यांनी केले ,विषय तज्ञ डॉ. मंजू दुबे यांच्या बियोडाटा चे वाचन श्री. गौतम वाणी यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. अशोक शेंडे यांनी केले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंजित मंडल कार्यशाळेंचे निमंत्रक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. गौतम वाणी व डॉ. हरिशीव प्रसाद यांनी कार्यशाळेचे नियोजन केले होते . कार्यशाळेस महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक वर्ग , शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.