एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत 11 शासकीय आश्रम शाळेमधील रिक्त *प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक* या पदांकरिता कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यास्तव दि. 27 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्याच्या परिसरातील एकूण 222 बेरोजगार शिक्षित तरुणांकडून सदर पदाकरिता अर्ज प्राप्त झालेले आहेत. 222 अर्जांपैकी 35 अर्जदार अपात्र ठरले आणि उर्वरित 187 पात्र उमेदवारांची *दि. 3 ऑक्टोबर 2023 ला सकाळी 9.00 वाजता* पासून मुलाखत घेण्यात येणार असल्याचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी कळविले आहे. मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रकल्प कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावून प्रकाशित करण्यात आलेली आहे. मुलाखतीनंतर रिक्त पदावर गुणांनुक्रमानुसार मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात येणार आहे. त्यामुळे मुलाखतीस पात्र असणाऱ्या सर्व उमेदवारांनी *3 आक्टोंबर 2023 ला सकाळी 9.00 वाजता* प्रकल्प कार्यालय सभागृहात न चुकता उपस्थित व्हावे, अशी सूचना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिलेली आहे.
