ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘दिलखुलास’ कार्यक्रमात बिपीन जगताप यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि 8 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार दि. 9 नोव्हेंबर 2022, गुरुवार दि. 10 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

            खादी व ग्रामोद्योग मंडळाचे महत्त्व, या मंडळाचे रोजगार निर्मितीतील योगदान, केंद्र आणि राज्य शासनाच्या  योजना व उपक्रम, मधाचे गाव संकल्पना, मध व इतर उत्पादनासाठी बाजारपेठ, मध केंद्र योजना अशा विविध विषयावर विस्तृत माहिती श्री. जगताप यांनी दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.