ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंध भारत बनवणे आपले कर्तव्य

– सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
संपूर्ण विश्वाला भारताची गरज आहे. आपले ज्ञान आणि विज्ञान ही आपली परंपरा आहे. हे ज्ञान विश्वाला द्यायचे आहे. त्यामुळे कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंध, एकरस, सुखी सुंदर भारत बनवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक Dr. Mohanji Bhagwat डॉ. मोहनजी भागवत यांनी सोमवारी येथे केले.

mohanji-1

श्री क्षेत्र आळंदी येथील स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या ‘गीता भक्ती अमृत महोत्सवी’ कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ. भागवत यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर स्वामी राजेंद्रदास महाराज, स्वामी गोविंददेव गिरी महाराज, रा. स्व. संघाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी, सदानंद महाराज, मारोतीबाबा कुरेकर महाराज, लोकेशमुनी, प्रणवानंद महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती. अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्यासह उपस्थित मान्यवर, संतांचा सन्मान करण्यात आला.
राष्ट्रातील शाश्वत मूल्यांची जपणूक व आचरण करणे हे सर्व संत-महंतांचे योगदान महत्त्वपूर्ण असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध महंत एकत्र येऊन प्रबोधन करणार आहेत, हा अमृत योग असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले. महाभारतानंतर ज्याप्रमाणे नैमिषरण्यात ऋषी संमेलन होऊन शास्त्रावर मंथन झाले, त्याचप्रमाणे येथेही अनेक संत-महंत एकत्र येत आहेत. त्यातून विश्व कल्याणासाठी मंथन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Dr. Mohanji Bhagwat : डॉ. भागवत म्हणाले, अयोध्येत 22 जानेवारीला रामलला विराजमान झाले. जे मंगल घडत आहे, ती ईश्वराची इच्छा आहे. देशातील महापुरुष, संत-माहात्म्यांच्या सामर्थ्य आणि पुरुषार्थामुळे हे शक्य होत आहे. ही नियतीची योजना आहे, जे झोपले आहेत, त्यांना जागे करण्यासाठी संत कायम प्रयत्नरत असतात. ज्ञानाचे अनुसंधान करणारे ऋषी असतात व ते सर्वत्र पोहोचविण्यासाठी घुमंतू बंधू पुरातन काळापासून प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागातील बांधव हे संपूर्ण विज्ञान तंत्रज्ञान समजू शकत नाही, असे अनेकांना वाटते. परंतु ते जुन्या काळापासून अनेक छोटे-छोटे विज्ञाननिष्ठ प्रयोग करीत असतात आणि हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे.
 
आपले मूळ विसरायला नको
श्रद्धा, भक्ती आणि समर्पण हे जनमानसात असणारे गुण आहेत. त्यात सातत्य ठेवण्याचे काम संत, विद्वान करीत असतात. संत ज्ञानेश्वरांनी ईश्वरनिष्ठेची मांदियाळी मागितली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ असे स्पष्ट केले. त्यामुळेच असे सात्त्विक कार्यक्रम होणे ही नियतीची इच्छा आहे. जग बदलत असले, तरी आपण आपले मूळ विसरू नये. ज्ञान आणि विज्ञान याची आपल्याकडे परंपरा आहे. आपल्याला विश्वाला ज्ञान द्यायचे आहे. भारत विश्वगुरू होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत राहायला हवे, असेही सरसंघचालक म्हणाले.
 
‘ते’ टपाल तिकीट गोविंददेव गिरींना भेट
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रकाशित केलेले टपाल तिकीट स्वामी गोविंददेव गिरी महाराजांना भेट म्हणून पाठवले. भाजपाचे माजी उपाध्यक्ष श्याम जाजू, आ. महेश लांडगे यांच्या उपस्थितीत Dr. Mohanji Bhagwat डॉ. मोहनजी भागवत यांनी ते प्रदान केले. यावेळी निष्काम कर्मयोगी श्रीधरपंत फडके, डॉ. शरद हेबाळकर, मुकुंदराव सोमण, अशोक वर्णेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.