गर्भवती महिला आणि माता यांच्या आरोग्यदायी जीवनासाठी देशभरात अनेक योजना राबविल्या जात आहेत. देशातील ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या दारिद्र रेषखालील कुटुंबामधील गर्भवती मातांना आर्थिक लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने जननी सुरक्षा योजना (Janani Suraksha Yojana 2022) १२ एप्रिल, २००५ रोजी सुरु केली. (Janani Suraksha Yojana Launched).जननी सुरक्षा योजनेअंतर्गत अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) दारिद्रय रेषेखालील मातांना (BPL) मोफत प्रसूती सेवा आणि आर्थिक सहाय्य देण्यात येते.
जननी सुरक्षा योजना पार्श्वभूमी:
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जननी सुरक्षा योजना करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दि. २६/१०/२००५ च्या शासन निर्णय क्र. जसुयो २००५/६७०/प्र.क्र.१७१/कु.क. नुसार सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात या योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली. त्यानंतर, दि. १४/०८/२००६ च्या शासन निर्णयानुसार जननी सुरक्षा योजना महाराष्ट्रातील नागरी भागात नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यास मान्यता देण्यात आली.
जननी सुरक्षा योजना उद्दिष्ट:
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील मातांना (BPL) आणि अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) महिलांचे आरोग्य संस्थेमध्ये होणारे प्रसुतीचे प्रमाण वाढवणे तसेच माता मृत्यु व अर्भक मृत्युचे प्रमाण कमी करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. (Janani Suraksha Yojana Objectives).
जननी सुरक्षा योजना लाभार्थी पात्रता:
१. दारिद्रय रेषेखालील सर्व गर्भवती महिला/माता तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सर्व गर्भवती महिला/माता (दारिद्रय रेषेखाली नसलेल्या देखील) योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील. (Janani Suraksha Yojana Eligibility).
२. लाभार्थी महिलेचे वय प्रसवपूर्व नोंदणी करताना कमीत कमी १९ वर्षे इतके असावे.
३. जननी सुरक्षा योजनेचा लाभ २ जिवंत अपत्यांपर्यंतच देय असतो.
जननी सुरक्षा योजना मिळणारा लाभ:
• ग्रामीण भागातील महिलांना मिळणारे लाभ: ग्रामीण भागातील पाञ लाभार्थी जर शासकीय/निमशासकीय आरोग्य संस्थेत प्रसूती झाली असल्यास तिला प्रसुतीच्या तारखेनंतर ७ दिवसाच्या आतमध्ये रु. ७००/- इतकी रक्कम धनादेशाद्वारे दिली जाते.
• शहरी भागातील महिलांना मिळणारे लाभ: ग्रामीण भागातील पाञ लाभार्थी जर शासकीय/निमशासकीय आरोग्य संस्थेत प्रसूती झाली असल्यास तिला प्रसुतीच्या तारखेनंतर ७ दिवसाच्या आतमध्ये रु. ६००/- इतकी रक्कम धनादेशाद्वारे दिली जाते किंवा आधार संलग्न असेल्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाते. (Janani Suraksha Yojana Amount).
• शहरी तसेच ग्रामीण भागासाठी दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील लाभार्थ्यांची प्रसुती घरी झाल्यास रु. ५००/- एवढी रक्कम लाभ प्रसुतीच्या तारखेनंतर ७ दिवसाच्या आत देण्यात येते. (Janani Suraksha Yojana Benefits In Marathi).
• सिझेरीयन शस्त्रक्रिया (Cesarean Delivery) झाल्यास पात्र लाभार्थीस रु. १५००/- इतकी रक्कम देण्यात येते.
जननी सुरक्षा योजना व आरोग्य सेविका (आशा वर्कर):
जननी सुरक्षा योजनेमध्ये (JSY In Marathi) आशा वर्करचा महत्वाचा सहभाग असतो. गर्भवती महिलेचे आरोग्य संस्थेत नाव नोंदणी करून घेण्यापासून ते पात्र लाभार्थीचा लाभ मिळवून देण्यापर्यंत विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडीत असतात.
• गर्भवती महिलांची नाव नोंदणी करून घेणे.
• नाव नोंदणी केल्यानंतर लाभार्थीस जननी सुरक्षा कार्ड मिळवून देणे.
• विहित नमुन्यातील अर्ज भरून घेणे.
• पात्र लाभार्थींकडून आवश्यक कागदपञे जमा करुन घेणे.
• प्रसूतीपूर्वीच्या तपासण्या करून घेणे.
• लसीकरण आणि लोहयुक्त गोळया मिळवून देणे अथवा त्याकरिता मदत करणे.
• शासकीय आरोग्य संस्थेत प्रसुतीकरिता प्रवृत्त करणे.
• लाभार्थींकडे बँक खाते नसल्यास, त्यांना बॅंकेत खाते उघडून घेण्यासाठी मदत करणे.
जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ग्रामीण भागात पात्र लाभार्थ्यांना आरोग्य संस्थेत प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्याबद्दल आशा कार्यकार्यकर्तीनां रु. ६००/- प्रती लाभार्थी मानधन देण्यात येते. त्यामधील रु. ३००/- गर्भवती
महिलेच्या प्रसूतीपूर्व आणि रु. ३००/- आरोग्य संस्थेत प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देण्यात येते.
शहरी भागात पाञ लाभार्थीची प्रसुती आरोग्य संस्थेत करण्यासाठी लाभार्थीस प्रवृत्त केल्यास एकूण रु. ४००/- प्रती लाभार्थी आशा कार्यकर्तीस मानधन म्हणून देण्यात येते. त्यामधील रु. २००/- प्रसूतीपूर्व आणि रु. २००/- आरोग्य संस्थेत प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देण्यात येते.
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शासकीय ग्रामीण व शहरी रुग्णालये, शासनमान्य खाजगी रुग्णालये या ठिकाणी जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळवता येतो.
जननी सुरक्षा योजना आवश्यक कागदपत्रे:
१. रहिवाशी दाखला
२. शाळेचे प्रमाणपत्र
३. जात प्रमाणपत्र
४. आधार कार्ड प्रत
५. बँक पासबुक झेरॉक्स
६. जननी सुरक्षा कार्ड
७. फोटो
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा अंगणवाडी केंद्रात भेट देऊन, नाव नोंदणी करण्यासाठीचा अर्ज प्राप्त करू शकता.. (Janani Suraksha Yojana Application Form).
जननी सुरक्षा योजना – महाराष्ट्र शासन अधिकृत संकेतस्थळ: https://arogya.maharashtra.gov.in