राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या उपस्थितीत फटाके फोडून, मिठाई वाटून, प्रचंड नारेबाजी करीत भाजपा कार्यकर्त्यांनी केला विजयाचा जल्लोष
अहेरी:-ग्रामपंचायत निवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर झाला असून, त्यात माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या नेतृत्वाखाली अहेरी विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टी पॅनलचे अहेरी तालुक्यातील खांदला ( राजाराम ) येते सुमनताई आलम यांचा सरपंच पदी तथा भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम येते शारदाताई कोरेत यांचा सरपंच पदी दणदणीत विजय झाला, त्यांनतर दोन्ही सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराज ह्यांची राजमहाल अहेरी येते भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले, ह्यावेळी राजेंनी स्वतः हार टाकून मिठाई देऊन सुमनताई आलम आणि शारदाताई कोरेत यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या..
ह्यानंतर लगेच अहेरी राजनगरीतील मुख्य चौक कै. राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटून तथा प्रचंड नारेबाजी करीत विजयाचा जल्लोष साजरा केला, ह्यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तथा खांदला (राजाराम) तथा मनेराजाराम येतील गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
