ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

खरीप हंगाम 2022 : ई पिक पाहणी पीक नोंदणी सारांश अहवाल ऑनलाईन पहा

खरीप हंगाम 2022 ई-पीक पाहणीचा सारांश अहवाल पाहण्याकरिता ऑनलाईन उपलब्ध आहे. शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीचा अहवाल पाहण्यासाठी महाभूमी डॉट जीओव्ही डॉट इन/महाभूमीलिंक वरील वेबसाईट मध्ये डाव्या बाजूला दिसत असलेल्या ई-पीक पाहणी लिंकवर  किंवा खालील महसूल विभागाच्या ई-पीक महाभूमी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

खरीप हंगाम 2022 : ई पिक पाहणी पीक नोंदणी सारांश अहवाल ऑनलाईन पहा – E Peek Pahani Crop Registration Summary Report

खालील महसूल विभागाच्या ई-पीक महाभूमी संकेतस्थळावर जाऊन, ई पिक पाहणी ॲपद्वारे आपल्या गावात किती जणांनी सातबारावर पिकांची नोंदणी केली पहा.

https://epeek.mahabhumi.gov.in/misv2/

ई-पीक महाभूमी संकेतस्थळ ओपन केल्यानंतर आपल्या समोर View Summary Report हा पर्याय पाहायला मिळेल, त्या पर्यायावर वरती क्लिक करा.

View Summary Report

पुढे आपला विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा आणि Show बटन वर क्लिक करा आणि पहा आपल्या गावाचा ई पिक पाहणी पिकांची नोंदणी सारांश अहवाल.

Show Report
Show Report

ई पिक पाहणी पीक नोंदणी सारांश अहवाल मध्ये खातेदाराचे नाव, खाते क्र., गट क्र., पीक पाहणी दिनांक, पिकाचे नाव, पिकाचा प्रकार, आणि  पेरणी क्षेत्र (हे. आर) मध्ये आपल्याला पाहायला मिळेल.

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीक पाहणीची नोंद केलेली नाही, त्या शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी स्वत: ई-पीक पाहणी या मोबाईल ॲप द्वारे करून घ्यावी जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ सर्वांना घेता येईल. असे आवाहन ई-पीक पाहणी महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक श्री. श्रीरंग तांबे यांचे कडून करण्यात येत आहे. तरी सर्व खातेदारांना आपले ई-पीक पाहणी मोबाईल ॲप अपडेट करून पीक पाहणीची नोंद करून घ्यावी.