अहेरी चा राजा विसर्जनाला उमडली जनसागर”बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!” च्या गजरात राजनगरितील अहेरीचा राजा गणरायाला निरोप
अहेरी येथील प्रसिद्ध असलेले अहेरी चा राजा गणेशाचे
“बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” च्या गजरात माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या राजमहाल पटांगणातून मोठ्या श्रध्देने आतिषबाजी, डोल ताशे, डिजे, छत्तीसगढ नृत्य, विविध प्रकारच्या वाद्यांच्या तालावर नाचत गाजत अहेरीचा राजा ला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
अहेरी राजनगरी त श्री गणरायाचे 19 सप्टेंबर ला विधिवत आगमन झाले. गणेश उत्सवाचे दहा दिवस मोठ्या उत्साहाने आनंदाने संपूर्ण तयारी राजनगरी साजरा केले या दहा दिवसात माझी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वात विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात एकल नृत्य, सामूहिक नृत्य, महिला भजन संध्या, पुरुष भजन संध्या, सुगम संगीत अशा विविध कार्यक्रमात संपूर्ण दहा दिवस साजरा करण्यात आले स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विशेष आकर्षक अशी स्मृतिचिन्ह व भेटवस्तू रोज स्पर्धकांना देण्यात आले.
रोजच्या स्पर्धेकरिता संपूर्ण राजनगरीतील तरुण युवती महिला व प्रतिष्ठित नागरिक तसेच गावकरी मोठ्या उत्सवाने आपली उपस्थिती ने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
अहेरीचे राजा गणेश मंडळाच्या रोज विधिवत पूजा अर्चना तथा महारथी करण्यात आले.
रोज कैरीचा राजा श्री गणेशाला सायंकाळी राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते महाआरती करण्यात येत होते त्याकरिता होणाऱ्या महाआरती करिता राजनगरीतील संपूर्ण गणेश भक्तांची मोठ्या संख्येने गर्दी असायचे महाआरतीनंतर लगेच प्रसाद वाटप तथा आरती संग्रह पुस्तिका उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना राजे साहेबांच्या हस्ते देण्यात आले.
महाआरती करिता अहेरी राजनगरीतील भाविक तसेच अहेरीलगत असलेले तेलंगाना राज्यातील भाविक आणि अहेरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, सिरोंचा या पाच तालुक्यातून गणेश भक्तांची मांदियाळी बघायला मिळाले.
